revenue department get first place in bribery 
पश्चिम महाराष्ट्र

लाचखोरीत महसूल विभाग ‘नंबर वन’

सकाळ वृत्तसंस्था

साताराः सातार लाचलुचपत विभागाने गेल्या वर्षात सापळे रचून ३६ लाचखोरांना अटक केली आहे. त्यामध्ये महसूल विभागाने ‘नंबर वन’ मिळवला आसून, पोलिस विभागाने दुसरा क्रमांक मिळवत लाचखोरीत आघाडीवर असल्याचे दाखवले आहे. विशेष म्हणजे दोन क्लास ‘वन’अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 

सर्वसामन्यांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी लाचखोरीत अघाडीवर असल्याचे दिसून येत आहेत. त्यामध्ये महसूल विभाग दुसऱ्या स्थानी आहे. महसूल विभागातील सर्वाधिक नऊ जणांना अटक करण्यात आली असून, त्या खालोखआल पोलिस विभागातील पाच जणांना अटक केली आहे. 

वन विभाग व भूमिअभिलेख (मोजणी) विभागातील प्रत्येकी दोघांना अटक करण्यात आली आहे. ग्रामविकास विभाग (जिल्हा परिषद), विधी व न्याय विभाग, महिला व बालविकास विभाग (पंचायत समीती), अन्न व औषध प्रशासन विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, सामाजिक न्याय विभाग व वित्त विभागाच्या प्रत्येकी एकावर कारवाई करून अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत विभागाच्या २७ कारवायांत ३६ जण जाळ्यात अडकले आहेत. 
 
‘क्लास थ्री’ मधील लोकसेवांचे लाचखोरीत प्रमाण जास्त असून २६ जणांवर करवाई करण्यात आली आहे . एका ‘क्लास टू’ अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. क्लास वन अधिकाऱ्यांवर कारवाई कमी होत असल्याची तक्रार असते. पण, गेल्या वर्षी दोन ‘क्लास वन’ अधिकाऱ्यांवर कारवाई केली गेली आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

खाजगी सहा व्यक्तींना अटक करण्यात आली आहे विशेष म्हणजे एका वकिलावरही कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक सरकारी कार्यालयात एखाद्या कामासाठी पैशाची मागणी केल्यास लाचलुचपत विभागाकडे संपर्क सधावा, असे अवाहन करुनही अनेक लहान-मोठे सरकारी अधिकारी कामासाठी पैशाची मागणी करतात. 

भ्रष्टाचार करण्यात महसूल विभागाने प्रथम क्रमांक मिळवला असून, खाकी वर्दीने दुसरा क्रमांक मिळवला आहे. गेल्या वर्षीपेक्षा कारवाईचा टक्का थोडा कमी झाला तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे. यंदा जानेवारी महिन्याच्या सुरूवातीलाच महसूल व पोलिसांवर प्रत्येकी एक कारवाई झाली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panhala ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद, चक्कर आलेल्या रुग्णावरही उपचार होईना; धक्कादायक VIDEO VIRAL

Parli bypass traffic news: परळी बायपास रविवारीपासून बंद; रेल्वे रुळ व पुलाच्या कामामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा ताण

Crime News: शिक्षकाचं दहावीच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य, अंगावर झोपून अश्लील चाळे अन्...; घटनेनं रायगड हादरलं

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

Dharur water crisis news: सहा पाणी योजना असूनही धारूरकरांना पाण्यासाठी भटकंती; वीस दिवसांपासून पुरवठा खंडित, ७५ वर्षांच्या आजीचा संघर्ष

SCROLL FOR NEXT