पश्चिम महाराष्ट्र

रिंगण सोहळ्याने कसबा तारळेत सप्ताहाची सांगता

सुरेश साबळे

कसबा तारळे - येथे वारकरी संप्रदायाच्यावतीने ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले होते. आज अश्व रिंगण सोहळ्याने सोहळ्याची सांगता झाली. येथील ज्ञानेश्वर मंदिरात झालेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण व 'राम कृष्ण हरी' नामजप सोहळ्यात शेकडो भाविक सहभागी झाले होते. 

येथील ज्ञानेश्वर मंदिराचे संकल्पक कै . बळवंत भोजने- महाराज यांच्या प्रेरणेने व कीर्तनकार वसंत साबळे - महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली येथे पारायण सोहळ्याचे आयोजन केले होते. सदाशिव पाटील - महाराज यांनी व्यासपीठ चालक म्हणून काम पाहिले. सप्ताह काळात वसंत साबळे, सदाशिव पाटील, सचिन संकपाळ (आळते ), पांडुरंग उपलाने (अवचितवाडी), बाळासाहेब पाटील (पुंगाव), पूर्णानंद काजवे (कोगनोळी), भानुदास महाराज आणि आनंदा माधव (आळंदी) आदींची प्रवचने व कीर्तने झाली. याशिवाय अनंत तेली, दत्त मंदिर व गजानन महाराज मंदिर भजनी मंडळ आणि सुतार बंधू यांचे भजनाचे कार्यक्रम झाले.

वसंत साबळे यांचे काल्याचे कीर्तन झाले. सुनील वणकुद्रे, अंकुश एकावडे, शांताराम सुतार, शामराव व सुरेश गुरव आणि गुंडू ननवरे आदींनी अनुक्रमे चोपदार ,मृदंग वादक, शिंग वादक, नगारा वादक म्हणून सेवा दिली.

आज दुपारी गावातून टाळ- मृदंगाच्या गजरात  दिंडी व नगर प्रदक्षिणा  झाली. यावेळी शिवाजी पेठ व पाटील गल्ली येथे अश्वाचे उभे रिंगण व प्राथमिक शाळेच्या पटांगणात गोल रिंगण उत्साहात झाले. या रिंगण सोहळ्याने सप्ताहाची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ODI & Test Captain: मोठा नेतृत्वबदल! १४१ आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू झाला कर्णधार, अफगाणिस्तानची घोषणा

Nalasopara ST Buses: आषाढी एकादशीपूर्वी नालासोपारा आगारात ५ नवीन एसटी बसेस; आमदार राजन नाईक यांच्या पाठपुराव्याला यश, वसई-विरार प्रवाशांना दिलासा

Bridge Collapse : मुळा-मुठा नदीवरील नवीन उभारणी केलेला पूल किरकोळ पुरात कोसळला; चौकशीची मागणी

Roha ST Negligence: रोहा आगाराचा भोंगळ कारभार: मुसळधार पावसात बससाठी ताटकळलेल्या विद्यार्थिनी, पालकांचा संताप उसळला

Delhi Protest: ''दलितांना, शेतकऱ्यांना भडकावल्यानंतर आता विद्यार्थ्यांना चेतवलं जातंय'', दिल्ली आंदोलनावर योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT