Police Rout March
Police Rout March Sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : पोलिसांच्यावतीने शहरात पथसंचलन

अमृत वेताळ

बेळगाव - रमजान ईद, शिव, बसव जयंतीच्या पार्श्वभूमीवर रविवार (ता. १) पोलिसांच्यावतीने शहरातील प्रमुख मार्गावरून पथसंचलन करण्यात आले. सन उत्सवाच्या काळात कोणत्या प्रकारची अनुचित घटना घडू नये. शहराच्या शांततेला धक्का पोहचू नये, यासाठी पोलीस खात्याच्यावतीने बंदोबस्ताची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. तसेच समाजकंटकांना इशारा देण्यासाठी काल पथसंचलन करण्यात आले. रविवारी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास राणी चन्नम्मा चौकातून पथसंचलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलिस उपायुक्त रवींद्र गडादी, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, खडेबाजारचे सहाय्यक पोलीस आयुक्त ए. चंद्राप्पा, मार्केटचे साहाय्यक पोलीस आयुक्त सदाशिव कट्टीमनी यांच्यासह शहरातील बहुतांशी अधिकाऱ्यांनी या पथसंचलन सहभाग घेतला होता.

काकतीवेस, शनिवार खुट, खंजर गल्ली, दरबार गल्ली, खडक गल्ली, भडकल गल्ली, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, चव्हाट गल्ली, जुना पी.बी. रोड, मार्केट पोलीस स्टेशन मार्गे खडेबाजार, टेंगीनकेरा गल्ली, भेंडी बाजार, आझाद गल्ली पर्यंत पथसंचलन करण्यात आले. यावेळी नागरिक पोलिस राज्य राखीव दलाचे जवान पथसंचलनात सहभागी झाले होते. कायदा व सुव्यवस्था कायम राहावी. कोणत्याही प्रकारे शांततेला धक्का पोहोचू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. पोलीस ठाणे निहाय बैठका देखील घेण्यात आल्या आहेत. शांतता समिती व शिवजयंती उत्सव मंडळाचे कार्यकर्त्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली आहे. हिंदू मुस्लिम समाजातील प्रमुख नागरिकांशी चर्चा करून सलोखा राखण्याचे आव्हान करण्यात आले आहे. रमजान, शिव, बसव जयंती सर्व सण एकाच वेळी आले असल्याने पोलिसांची कसोटी लागली आहे. त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैणात असणार आहे. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: मुंबईतील मतदान केंद्रांवर सुविधा नाहीत; आदित्य ठाकरेंनी व्हिडिओद्वारे मांडली समस्या

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: जावेद अख्तर, शबाना आझमींनी मुंबईत केले मतदान

Deepthi Jeevanji : भारत की बेटी सब पर भारी... दीप्तीने जपानमध्ये रचला इतिहास! 400 मीटर T20 शर्यतीत जिंकले 'गोल्ड मेडल'

IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

SCROLL FOR NEXT