RTE
RTE 
पश्चिम महाराष्ट्र

‘आरटीई’त प्रवेशास बुधवारअखेर मुदत

सकाळ वृत्तसेवा

सातारा - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशासाठी तिसऱ्या फेरीतील प्रवेश प्रक्रियेला प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पालकांनी बुधवारपर्यंत (ता. २४) पाल्याचा प्रवेश निश्‍चित करणे आवश्‍यक बनले आहे.

आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी दहा जुलै रोजी तिसरी सोडत काढण्यात आली होती. या सोडतीमध्ये निवड झालेल्या पालकांनी १८ जुलैपर्यंत पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेणे आवश्‍यक होते. परंतु, नेहमीप्रमाणे गुरुवारपर्यंत (ता. १८) प्रतिसाद कमी मिळाला. त्यामुळे शिक्षण विभागाने प्रवेशासाठी २४ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

या योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील २४० शाळांमध्ये दोन हजार २४० जागा आहेत. प्रवेशासाठी दोन हजार ४३८ अर्ज प्राप्त झाले असून, एक हजार ८९६ अर्जांची निवड झाली आहे. त्यापैकी पूर्वीच्या दोन सोडतींमध्ये एक हजार १३० प्रवेश झाले आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाने नुकतीच राज्यस्तरीय तिसरी फेरी जाहीर केली. त्यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना गुरुवारी (ता. ११) एसएमएस पाठवण्यात आले होते. एसएमएस मिळालेल्या पालकांनी १८ जुलैपर्यंत कागदपत्रांची पडताळणी करून निवड झालेल्या शाळांमध्ये प्रवेश घेणे आवश्‍यक होते. सद्य:स्थितीत केवळ दहाच प्रवेश निश्‍चित झाले. हीच परिस्थिती राज्यातही आहे. प्रवेश घेण्याच्या दिरंगाईमुळे अखेर शिक्षण विभागाने २४ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, यासाठी राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना २६ जुलैपर्यंत प्रवेशाची स्थितीची माहिती पाठविण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT