Sangali News sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangali News : वाळवा-पलूस तालुक्यात चोरीच्या घटनांनी घबराटीचे वातावरण ; घाबरून न जाण्याचे पोलिसांचे आवाहन

वाळवा, आष्टा तसेच तालुक्यातील नदीकाठच्या परिसरात चोरट्यानी धुमाकूळ घातला असल्याच्या घटनांनी वातावरण ढवळून निघाले आहे.

धर्मवीर पाटील,

इस्लामपूर (जिल्हा सांगली) : वाळवा, आष्टा तसेच तालुक्यातील नदीकाठच्या परिसरात चोरट्यानी धुमाकूळ घातला असल्याच्या घटनांनी वातावरण ढवळून निघाले आहे. प्रत्यक्षात चोरीच्या घडणाऱ्या घटना, दाखल होणारे गुन्हे आणि निर्माण झालेले वातावरण यात मात्र तफावत आहे. या वातावरणात घाबरून जाऊ नये आणि गैरसमजातून कोणतीही समाजविघातक कृत्ये करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

वाळवा आणि पलूस तालुक्यातील कृष्णा नदीच्या काठावरील गावांमध्ये सध्या घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही चोर टोळीने फिरत असून नागरिकांवर हल्ले करत आहेत आणि सोने व रोख रक्कम लुटून नेत असल्याच्या चर्चा आहेत. नदीकाठावरील गावांमध्ये रात्री गस्ती घातल्या जात आहेत. चोर कमी आणि त्यांना शोधणारेच जास्त असे चित्र निर्माण झाले आहे. रात्री उशिरापर्यंत काही तरुण हातात बॅटरी घेऊन परिसरात, शेतात, माळावर फिरत आहेत, त्यामुळे वातावरण आणखी गढूळ बनत आहे. चोरांच्या शोधासाठी फिरणाऱ्या लोकांनाच चोर आले आहेत की काय असे समजून त्यांचाही पाठलाग केल्याच्या घटना घडल्या आहेत तर आष्टा परिसरात एका मनोरुग्ण व्यक्तीला तसेच एका बॅग विक्री करणाऱ्या व्यक्तीला चोर समजून जमावाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. वाळवा येथे एका टेम्पोवरही दगडफेक झाली आहे.

दरम्यान या तथाकथित चोरांनी 'ड्रोन'सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चोरीचा फंडा अवलंबला असल्याच्या प्रकारानेही जोर धरला आहे. प्रत्यक्षात हे ड्रोन जवळून कुणी पाहिल्याचे निदर्शनास आणून दिलेले नाही. शिवाय हे ड्रोन पोलिसांचे असल्याचा आणखी एक गैरसमज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी हे स्पष्टपणे नाकारले असून नागरिकांनी कोणत्याही अफवांनी घाबरू नये किंवा बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.

सोशल मीडिया जपून वापरा

कोणतीही शहानिशा, खात्री न करता काही लोक सोशल मीडियावर वाटेल ती माहिती पसरवत आहेत. त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो याचे भान बाळगण्याची गरज आहे. असे काही प्रकार उघडकीस आल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

"सहज बोलताना ड्रोन पोलिसांचा असू शकतो किंवा काहीवेळा सरकारी ड्रोन असू शकतात, असे मत व्यक्त केले होते. परंतु सध्या ज्या ड्रोनची अफवा पसरली आहे ते ड्रोन आमचे आहेत, असा त्याचा अर्थ नाही. बंदोबस्ताच्या वेळी आम्ही ड्रोन वापरत असतो. आमच्याकडे फक्त एक ड्रोन आहे. आसपास जे व्यावसायिक ड्रोन असतात, त्यांना परवानगी मिळालेली असते. ग्रामविकास, जिल्हा प्रशासन यांचेही ड्रोन असतात. महापुरासारख्या प्रसंगात ते वापरले जातात. ड्रोन वापरून चोरी करायला एवढे 'हायटेक' चोर असू शकत नाहीत. नागरिकांनी घाबरू नये. काही शंका आल्यास ११२ क्रमांकावर संपर्क साधावा."

-मंगेश चव्हाण,

पोलीस उपअधीक्षक, इस्लामपूर-शिराळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT