पश्चिम महाराष्ट्र

कारखानदार, खासदार संघटनेचे मॅच फिक्‍सिंग - सदाभाऊ खोत

सकाळवृत्तसेवा

माजगाव - लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कारखानदार व खासदार संघटनेचे मॅच फिक्‍सिंग आहे, असा आरोप करीत शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम व्याजासहित देण्यास भाग पाडू. शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा, असे आवाहन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. 

आळवे (ता. पन्हाळा) येथे विकासकामांच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच वर्षाताई गायकवाड होत्या. दरम्यान, उत्रे व आळवे गावातील विविध विकासकामांचे  उद्‌घाटन खोत यांच्या हस्ते झाले. 

खोत म्हणाले, ‘‘कारखानदारांनी इथेनॉल निर्मितीसाठी प्रयत्न करावा व शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा. तसेच शेतकऱ्यांना उर्वरित २० टक्के रक्कम व्याजासहित द्यावी, असे आपण मुख्यमंत्र्यांना सूचित केले आहे.’

उपसभापती संजय माने, शंकर काशीद, पृथ्वीराज सरनोबत, उत्तम धुमाळ, प्राचार्य एन. डी. चौगले, सरपंच रंगुताई मगर उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT