SHIVJAYANTI RALLY
SHIVJAYANTI RALLY 
पश्चिम महाराष्ट्र

VIDEO : शिवजयंतीला निघणार सदभावना रॅली

सकाळ वृत्तसेवा

नगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी शहरात सदभावना रॅली काढण्यात येणार आहे. त्यात सर्व धार्मिय समाबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे यांनी केले आहे. शिवजयंती जयंतीनिमित्त प्रत्येकाने घरावर भगवा ध्वज उभारावा आणि घरासमोर रांगोळी काढावी. 


शिवाजी महाराजांना अभिवादन करावे. बुधवारी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीस सुरवात होणार आहे. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅली मार्केट यार्ड, माळीवाडा, बंगाल चौकी, हातमपुरा, तेलीखुंट, चितळेरोड, दिल्लीगेट, नीलक्रांती चौक, बालिकाश्रम रोड, प्रेमदान चौक, प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग, श्रीराम चौक, गुलमोहोर रोड, मिस्किन मळा, तारकपूर, लालटाकी मार्गे चौथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे अभिवादन करून रॅलीची सांगता होणार आहे.

न्यू आर्टस महाविद्यालयात जयंतीची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

पतसंस्थेत अभिवादन 
अहमदनगर जिल्हा मराठा नागरी सेवा पतसंस्थेतर्फे बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणुक काढण्यात येणार आहे. तर, संस्थेच्या मार्केट यार्ड शाखेत बाजार समिती शाखा व भिंगार शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. संगमनेर, नेवासे, पाथर्डी येथील शाखेतही अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

पंधराशे पोलिसांचा बंदोबस्त 
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची सर्वत्र तयारी सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस दलाने चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात एकूण पंधराशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्यात राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी, शीघ्रकृती दल, दंगल नियंत्रण पथकांचा समावेश आहे. 

सहा हजार मुले सहभागी होणार 
जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या रेसिडेन्सिअल हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय, न्यू आर्टस सायन्स ऍण्ड कॉमर्स महाविद्यालयासह विविध शाखांमधील सहा हजार मुले मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, संभाजी राजे यांच्या वेशभूषेतील मुले मिरवणुकीचे आकर्षण असतील. लेझीम पथक, झांज पथक, ढोल पथक, एनसीसी, एनएसएस, पथकही मिरवणुकीत सहभागी होणार आहे. सर्व मुले पारंपरिक वेषभूषेत येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघालेल्या मिरवणुकीची रेसिडेन्सिअल हायस्कूलच्या मैदानावर सांगता होणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT