Sakshi Suryavanshi sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sakshi Suryavanshi : 'अचानक एक दिवस पायाला जखम झाली अन्..' ऑलिम्पिक बनलेय ‘ती’चे अंतिम ध्येय

बॅडमिंटनसारख्या खेळात चमकदार कामगिरी सुरू असतानाच अचानक एक दिवस पायाला जखम होते आणि तो खेळ सुटतो.

धर्मवीर पाटील,

बॅडमिंटनसारख्या खेळात चमकदार कामगिरी सुरू असतानाच अचानक एक दिवस पायाला जखम होते आणि तो खेळ सुटतो. आवडीचा खेळ सुटल्याने नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या मुलीला आई-वडील पिस्टल शूटिंगचा पर्याय उभा करतात आणि हा पर्याय आज तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवतो. परिस्थितीनिहाय बदल करत आज ती ऑलिम्पिकच्या दिशेने निघाली आहे. आता ते तिचे अंतिम ध्येय बनले आहे. ही कहाणी आहे, साखराळे गावच्या साक्षी सूर्यवंशी हिची.

आई मनीषा आणि वडील अनिल या दोघांनी आपले सर्वस्व पणाला लावत आपल्या मुलांच्या खेळाची आवड जोपासली आहे. साक्षीला पिस्टल शूटिंग क्रीडाप्रकारात तयार करणे या कुटुंबाच्या आवाक्याबाहेरचे असतानाही या दाम्पत्याने तिला काहीही कमी पडू द्यायचे नाही, असा निश्चय करत आज आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले आहे. आतापर्यंत वीस लाख रुपयांहून अधिकचे कर्ज, सामाजिक क्षेत्रातील लोकांनी केलेली मदत, घरातील सोने गहाण ठेवून उभारलेली रक्कम अशा विविध मार्गांनी साक्षीच्या वाटेतले अडथळे तात्पुरत्या का होईना बाजूला करत आज तिचा प्रवास सुरू आहे.

अझरबैझान देशातल्या बाकू राजधानीत ५१ देशांच्या सहभागातून सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिच्या संघाने मिळवलेले सुवर्णपदक चर्चेचा विषय बनले आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचे ध्येय बाळगणारी साक्षी अत्यंत आत्मविश्वासाने आणि जिद्दीने वाटचाल करत आहे.

साक्षीचे वडील कराटेमधे ब्लॅक बेल्ट आहेत. आईही खो-खो खेळाडू आहे. भाऊ यश आतापर्यंत सहा देशांमध्ये बॅडमिंटन खेळून आला असून त्याने क्रोएशिया येथे ज्युनिअर बॅडमिंटन चॅम्पिनयशिप गाजवली आहे. २०१६ मध्ये बॅडमिंटन खेळताना साक्षीचा पाय दुखावला आणि ती खेळापासून दुरावली. या काळात तिला नैराश्याने ग्रासले. यातून तिला बाहेर काढण्यासाठी आई-वडिलांनी महत्‌प्रयास केले. ती अकरावीत गेल्यावर तिला पिस्टल शूटिंग प्रकारात प्रोत्साहन दिले.

सुरवातीलाच तिने अशी चमक दाखवली की, तिने आजतागायत मागे वळून पाहिले नाही. जितेंद्र विभूते यांच्यासारख्या तज्ज्ञ प्रशिक्षकामुळे तिचा उत्तम सराव सुरू आहे. कोल्हापूरला ‘कुसाळे रेंज’ला दोन वर्षे तिथेच राहून ती सराव करतेय. ऑलिम्पिक गाजवण्याचे तिचे ध्येय सत्यात उतरविण्यासाठी वडिलांनी आतापर्यंत त्यांची वाहने विकली आहेत. एकेकाळी हाताखाली सहा कामगार होते, आज मागणीच्या ठिकाणी जाऊन स्वतः सळई उतरवतात. आईने घरातील सोनेही विकले आहे.

शासन लक्ष देईल?

साक्षीसमवेत हरियाणा आणि पंजाबच्या दोघी खेळाडू होत्या. बाकूच्या स्पर्धेत सहभागी होताना त्यांच्या शासनाने आधीच १० लाख रुपयांची खर्चाची जबाबदारी स्वीकारली. परंतु तुलनेने महाराष्ट्र शासन उदासीनच आहे. साक्षीला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कुटुंबाने कर्ज काढले आहे आणि खासगी मदतही मिळवली आहे. स्पर्धेला जातानाच साक्षीला विविध अडथळ्यांना तोंड द्यावे लागले होते. या स्पर्धेची तयारी अत्यंत खर्चिक आहे. रोज आठ-दहा तासांचा सलग सराव करावा लागतो. शासन अशा ध्येयवादी खेळाडूंकडे लक्ष देईल का, हा प्रश्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT