पश्चिम महाराष्ट्र

संभाजी ब्रिगेड संघटनेकडून कन्हैया कुमार, हार्दिकचा होणार सन्मान

सकाळवृत्तसेवा

सोलापूर : देशातील व राज्यातील जातीयवादी व धर्मांध सरकार ज्यांना देशद्रोही ठरवत आहे, त्या कन्हैया कुमार व हार्दिक पटेल यांना संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीने देशभक्त पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात या पुरस्काराचे सन्मानाने वितरण होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज सोलापूर शहर व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यानिमित्त आल्यानंतर गायकवाड यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शहराध्यक्ष श्‍याम कदम, महेश सावंत, इलियास शेख याच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

कोरेगाव भीमा दंगलही भाजप सरकार पुरस्कृत आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतःकडे गृह, विधी व न्याय मंत्रालयाची खाती ठेवून आरोपींना क्‍लिनचिट देण्याचे काम करत असल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या गुन्हेगारी प्रतिमेमुळे परकीय गुंतवणूक या देशात होत नाही. परदेशात जाऊन त्या ठिकाणी भारतीयांच्या सभा घेऊन तेथील सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी यांचा फसला असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. 

तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेतून भारतीयांना सर्व हक्कांची तरतूद करण्यात आली आहे परंतु घटनेची पूर्ण अंमलबजावणी होत नाही. घटनेची अंमलबजावणी व्हावी, महाराष्ट्रातील जातीय सलोख्याचे वातावरण टिकून राहावे, यासाठी संभाजी ब्रिगेड येत्या काळात काम करणार आहे. त्यासाठी संघटनात्मक व एैत्याहासिक विषयांचा अभ्यास करण्यासाठी केडर कॅम्प घेण्यात येणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT