rajhans dodh sangh
rajhans dodh sangh 
पश्चिम महाराष्ट्र

राज्यात संगमनेरचा सहकार अग्रस्थानी 

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर ः राज्यात संगमनेरचा सहकार अग्रस्थानी आहे, यात शंका नाही. राज्यातील साखर कारखाने बंद पडत असताना संगमनेर कारखाना व राजहंस दूध संघ मात्र जोरात सुरू आहे. यामुळेच अडचणीत असलेल्या "महानंदा'ची जबाबदारी अध्यक्ष म्हणून रणजितसिंह देशमुख यांच्याकडे दिली, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात केले. राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांची "महानंदा'च्या अध्यक्षपदी निवड झाल्याने, त्यांच्या संगमनेरातील सत्कारप्रसंगी ते बोलत होते.

म्हणून देशमुख यांना संधी

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर होते. थोरात म्हणाले, की दूरदृष्टीचे दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हरितक्रांती व त्यातून श्वेतक्रांती आली. सहकारी दूध संघाच्या स्थापनेतून निर्माण झालेल्या दुधाच्या महापुराच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सहकारातील दूध संघांच्या महासंघाची स्थापना झाली. "महानंदा'च्या अध्यक्षपदी दुग्धविकासमंत्री व उपाध्यक्षपदी राज्यमंत्री अशी परंपरा होती. या काळात प्रत्येकाने केलेल्या नोकरभरतीमुळे खर्चाचा भार प्रचंड वाढला. दरम्यानच्या काळात अनेक खासगी दूध संघ निर्माण झाल्याने अडचणी वाढत गेल्या. यामुळे क्षमता असलेल्या रणजितसिंह देशमुख यांना ही संधी देण्यात आली. 

हा काटेरी मुकूट

देशमुख म्हणाले, की "महानंदा'च्या अध्यक्षपदी निवड होणे हा संगमनेर तालुक्‍यातील सहकाराचा सन्मान आहे. शेवटच्या एक वर्षाच्या कालखंडासाठी हा काटेरी मुकुट सांभाळण्याची व संघाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले. चुकीच्या माणसांच्या हाती संघाचा कारभार असल्याने दैनंदिन 12 लाख लिटरवरून दूधसंकलन अडीच लाख लिटरवर आले.

खडसे यांचा राजीनामा

भरमसाट नोकरभरती केल्याने सातवा वेतन आयोग लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्षाकाठी 60 कोटी रुपये पगारावर खर्च होतात. राज्यातील 21 विभागांतून निवडलेल्या प्रतिनिधींमधून 18 संचालकांनी मागणी केल्याने नंदा खडसे यांनी राजीनामा दिला. ज्येष्ठ नेते अजित पवार, जयंत पाटील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे यांच्यासह भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मोलाची मदत केल्याने या पदापर्यंत पोचता आल्याचे त्यांनी सांगितले. 

"महानंदा'च्या ऊर्जितावस्थेसाठी प्रयत्न
महानंद संघाला नवसंजीवनी देण्याची जबाबदारी आपल्यावर असून, दिवंगत भाऊसाहेब थोरातांनी घालून दिलेल्या काटकसर, प्रामाणिकपणा, पारदर्शकता व आर्थिक नियोजन या सहकाराच्या तत्त्वांवर कारभार चालविण्याचा प्रयत्न करणार आहे. दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी "महानंदा'च्या ऊर्जितावस्थेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यापूर्वीचे मंत्री आणि अधिकारी नकारात्मक असल्यामुळे महासंघाचा ऱ्हास झाल्याचे सांगत या सरकारच्या काळात "महानंदा'ला ऊर्जितावस्था देण्याचा प्रयत्न आहे.

यावेळी माधव कानवडे, भाऊसाहेब कुटे, शिवाजी थोरात, लक्ष्मण कुटे, हरिभाऊ वर्पे, बाबा ओहोळ, रामदास वाघ, शंकर खेमनर, सुरेश थोरात, कैलास पानसरे, नवनाथ अरगडे, गुरमित डंग, मोहन करंजकर, डॉ. प्रताप उबाळे उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी कारवाई, शूटर्सचा सर्वात मोठा मदतनीसाला राजस्थानमधून अटक

SCROLL FOR NEXT