The Sangli and Satara police forces have been declared Presidential Medal
The Sangli and Satara police forces have been declared Presidential Medal 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली व सातारा पोलिस दलातील या अधिकार्यांना जाहिर झाले राष्ट्रपती पदक...

सकाळ वृत्तसेवा

सांगली - तुरची प्रशिक्षण केंद्रातील वरिष्ठ निरीक्षक संभाजी सुदाम सावंत यांना आज राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. सन १९८९ मध्ये ते पोलिस दलात भरती झाले आहेत. जळगाव, धुळे, नंदुरबार, मुंबई, सिंधुदुर्ग, मालेगाव, नाशिक येथे त्यांनी सेवा बजावली आहे. त्यांना यापूर्वी पोलिस महासंचालक पदकही प्रदान करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयातर्फेही त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

वसंत साबळेंना दुसऱ्यांदा पदक

कोरेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक वसंत साबळे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक मिळवणारे ते राज्यातील, तसेच जिल्हा पोलिस दलातील एकमेव पोलिस कर्मचारी आहेत. वसंत साबळे यांचे मूळ गाव वडूज (ता.  सातारा) असून, ते सन १९८४ मध्ये पोलिस दलात भरती झाले. त्यांनी खंडाळा, फलटण, कऱ्हाड, सातारा येथे सेवा बजावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT