पश्चिम महाराष्ट्र

पडळकरांची बैलगाडा शर्यत झालीच; रात्रीत बदलला ट्रॅक

नागेश गायकवाड

प्रशासनाने शर्यत होऊ न देण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता. मात्र काहीही झालं तरी शर्यत पार पडणार असं म्हटलेल्या पडळकरांनी शर्यत अखेर भरवलीच.

आटपाडी : प्रचंड पोलिस बंदोबस्त आणि संचारबंदी लागू केलेली असतानाही पोलिस-प्रशासनाला चकवा देऊन आमदार गोपीचंद पडळकर यांनी वाक्षेवाडीच्या पठारावर (wakshevadi) सूर्योदयासोबत बैलगाडी शर्यतीचे मैदान पार पाडले. शर्यतीसाठी राज्यातून विविध भागांतून हजारोंच्या संख्येने तरुण शेतकरी आले होते. शर्यतीनंतर आमदार पडळकर (Gopichand padalakr) यांनी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्यभर उभारणाऱ्या आंदोलनाला साथ देण्याचे आणि तरुणांनी शांततेत घरी जाण्याचे आव्हान केले.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी बंदीचा आदेश झुगारून झरेत बैलगाडी शर्यतीच्या मैदाचे आयोजन केले होते. या शर्यत होऊ नये म्हणून पोलिसांनी मैदान उध्वस्त केले होते. झरे परिसरात कडक पोलिस बंदोबस्तही ठेवला होता. तसेच संचारबंदी लागू केली होती. शर्यतीसाठी काल रात्री माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, (sadabhau khot) माणचे आमदार जयकुमार गोरे झरेत दाखल झाले होते. मध्यरात्री गनिमी काव्याने शर्यतीचे ठिकाण बदलून वाक्षेवाडीच्या पठारावर शर्यती घेण्याचे नियोजन केले.

मोजके निवडक कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी मध्यरात्रीच वाक्षेवाडीच्या माळावर ट्रॅक्‍टरच्या सहायाने मैदान बनवले. पहाटे शर्यतीसाठी मोजक्याच बैलगाड्या दाखल झाल्या. सकाळी सहा वाजता वाक्षेवाडीच्या मैदानावर हजारो तरूणासमोर पठारावर शर्यत पार पडली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांना उपस्थित राहता आले नाही. शर्यती पार पडल्यानंतर ते मैदानावर आले. यावेळी राज्यभरातून दाखल झालेले हजारोंच्या संख्येने तरुण आले होते.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी तरुणांना पोलिस प्रशासनाशी कोणताही वाद न करता आणि शर्यतीला गालबोट न लावता शांततेत घरी जाण्याचे आव्हान केले. तसेच बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्यभर आंदोलन उभा करून त्याला साथ देण्याचे आवाहन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT