jaynt patil sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli : केंद्र सरकारचे सामान्य माणसांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष; जाहिरातीवर कोटयावधी रुपये खर्च - जयंत पाटील

साखराळे येथे 'एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी' या उपक्रमाअंतर्गत

धर्मवीर पाटील,

इस्लामपूर - भाजपा केंद्र सरकारचे सामान्य माणसांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अनेक लोकप्रिय घोषणा करून जाहिरातीवर कोटयावधी रुपये खर्च करतील. आपण विचलित न होता जागृत व सावध रहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केले. राज्य सरकारला कृष्णा नदीतील पाण्याचे योग्य नियोजन करता आले नसल्याने आपणास पाणी टंचाईस सामोरे जावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

साखराळे येथे 'एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी' या उपक्रमाअंतर्गत आयोजित सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, आनंदराव पाटील, सरपंच सुजाता डांगे, अविनाश पाटील, बाबुराव पाटील, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षा अलका माने, रामराजे पाटील प्रमुख उपस्थित होते.

आमदार जयंत पाटील यांनी केंद्र सरकार लोकप्रिय घोषणा करून जाहिरातीवर कसे खर्च करते आणि त्यातून काहीच कसे साध्य होत नाही, याची जंत्रीच ग्रामस्थांच्या समोर ठेवली. ते म्हणाले, "मेक इन इंडिया हा केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करीत सुरू केलेला उपक्रम पूर्णपणे अपयशी ठरला आहे. बेटी बचाव,बेटी पढाव या योजनेवर एकूण १३६७ कोटी खर्च झाले त्यातील ७४० योजनेवर तर तब्बल ४०० कोटी जाहिरातीवर खर्च केले. उज्ज्वला गॅस योजनेतील ९२ लाख कुटुंबांनी एकदाही गॅस सिलेंडर भरून आणले नाही तर ३ कोटी कुटुंबाने केवळ २ वेळा सिलेंडर भरून आणले आहे. व्यावसायिक सिलेंडर १०१ रुपयांनी वाढविले असल्याने चहा-भजी, वडा-पाव आदी नाष्टा करणारांना चार पैसे जादा मोजावे लागतील.

पैसे गोळा करण्याचा उद्योग!

खते, बी-बियाणे विक्रेत्या दुकानदारांना मोक्का लावण्याची भाषा म्हणजे पैसे गोळा करण्याचा उद्योग आहे. मोक्का लावायचा झाला तर तो बियाणे निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना लावायला हवा, असे जयंत पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT