Sangli Vidhansabha election Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Vidhan Sabha Election 2024 : सांगली मतदार संघात सर्वत्र ईर्षा अन् चुरस

Sangli Election 2024: जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागलेल्या सांगली विधानसभा मतदार संघात काँटे की टक्कर असल्याने मतदानासाठी ईर्षा दिसून आली. काही ठिकाणी मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड होण्याचे किरकोळ प्रकार वगळता चुरशीने ६३.११ टक्के मतदान झाले.

सकाळ वृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागलेल्या सांगली विधानसभा मतदार संघात काँटे की टक्कर असल्याने मतदानासाठी ईर्षा दिसून आली. काही ठिकाणी मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड होण्याचे किरकोळ प्रकार वगळता चुरशीने ६३.११ टक्के मतदान झाले. त्यामुळे २३ रोजी जाहीर होणाऱ्या निकालात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.

सांगली विधानसभा मतदारसंघात यंदा काँग्रेसचे नेते स्व. मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी बंडखोरी केल्याने मोठ्या प्रमाणात चुरस दिसून येत आहे. भाजपा महायुतीचे आमदार सुधीर गाडगीळ, काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील आणि श्रीमती पाटील यांच्यात तिरंगी लढत होत आहे. त्यामुळे आज मतदानही चुरशीने झाले.

सांगली मतदार संघात सकाळच्या काही ठिकाणी संथ गतीने मतदानास प्रारंभ झाला. नऊ वाजेपर्यंत मतदार संघात ७.६ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदानाने गती घेतली. मतदार बाहेर पडू लागल्याने मतदान केंद्रांवर रांगा दिसू लागल्या.

विशेष करून महिला मतदारांमध्येही उत्साह होता. प्रशासनाने दोन मतदान केंद्रे ‘पिंक मतदान केंद्रे’ केली होती. या मतदान केंद्रांवर महिला कर्मचारी कार्यरत होते. हे मतदार संघ सजवण्यात आले होते. तर म के आठवले विद्यामंदिर येथे आदर्श मतदान केंद्र केले होते. तेथे मुलांसाठी खेळणी ठेवण्यात आली होती.

सर्व मतदान केंद्रांवर सकाळी दहानंतर गर्दी दिसू लागली. तीनही प्रमुख उमेदवारांचे कार्यकर्ते बूथवर थांबून मतदानाचा अंदाज घेत होते. आपले किती मतदार आले कोण राहिले याची चाचपणी करुन मतदान बाहेर काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे मतदानास चुरस दिसून आली. दुपारच्या सत्रात काही वेळ मतदान संथ झाले.

त्यानंतर पुन्हा मतदानाने जोर घेतला. सकाळचे दोन तासांचे सत्र वगळता नंतरच्या प्रत्येक दोन तासांच्या सत्रात सरासरी १२ ते १३ टक्के मतदान झाले. मतदानाची वेळ संपल्यानंतर कोण विजयी होणार कुणी कुठल्या गावात, प्रभागात आघाडी घेतली कोण कुठे पिछाडीवर आहे याचे अंदाज कार्यकर्ते लावू लागले. मात्र एकूणच चुरस लक्षात घेता आता सगळ्यांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत.

मतदानाची टक्केवारी

सकाळी ९ वाजेपर्यंत ७.६, सकाळी ११ वाजेपर्यंत १९.६, दुपारी एक वाजेपर्यंत ३२.२३ दुपारी तीन वाजेपर्यंत ४३.८६, पाच वाजेपर्यंत ५६.०४ टक्के मतदान झाले होते. रात्री उशिरा मिळालेल्या आकडेवारीनुसार ६३.११ टक्के मतदान झाले होते.

मतदानात महिला पुढे

सांगली मतदार संघात १ लाख ७७ हजरा ६९३ पुरुष तर १ लाख ७८ हजार ६४२ महिला मतदार आहेत. ७५ इतर मतदार आहेत. एकूण ३ लाख ५६ हजार ४१० मतदार या मतदार संघात आहेत. यात शहरातील मतदारांचा वाटा मोठा आहे. पाच वाजेपर्यंत एक लाख ६१९ पुरुष तर ९९ हजार ८३ महिला आणि १९ इतर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या वेळेपर्यंत १,९९,७२१ मतदारांनी मतदान केले होते.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT