Sangli industrialist decided to support Govt administration for fight against corona 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोना विरोधात लढण्यास इथले उद्योजक प्रशासनाच्या पाठीशी...

हृषीकेश माने

कुपवाड : देश-विदेशात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना रोगाच्या धसक्‍याने औद्योगिक क्षेत्रातील उद्योग व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आयात-निर्यात बंद झाल्याने आर्थिकचक्र थांबले आहे. दरम्यान, सध्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाला सहकार्य करण्याचा ठाम निर्णय कुपवाडच्या उद्योजकांनी घेतला आहे. 

कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक क्षेत्रात परदेशातून होणारी कच्च्या मालाची आयात आणि उत्पादनाच्या निर्यातीस बंदी असल्याने मंदीचे सावट निम्म्याहून अधिक जाणवते. मोठमोठ्या कारखान्यांमध्ये शिलकीतील कच्च्या मालापासून उत्पादनाचा साठा तयार करून ठेवण्याचे काम दैनंदिनपणे सुरू आहे. उद्योगापेक्षा शारीरिक दक्षतेचे महत्त्व अधिक असल्याने प्रशासकीय सूचनेचे पालन करण्याचा निर्णय कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्सच्या वतीने घेण्यात आला. 

चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू म्हणाले,""देशातील औद्योगिक क्षेत्रासाठी कच्च्या मालाची होणारी आयात चीन देशातून होते. यामध्ये ऑटोमोबाईल पार्ट, इंडस्ट्रीज मशिनरी पार्ट, केमकल्स, इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे, शेती औषधातील घटक यासारख्या गोष्टी उपलब्ध होतात. सध्या मटेरियलची आयात बंद असल्याने उत्पादनाची गती झपाट्याने कोसळले आहे. देशांतर्गत माल खपवण्याची बाजारपेठ बंद असल्याने शिल्लक उत्पादनाच्या होणाऱ्या मागण्या बंद झाल्या. प्रामुख्याने ऑटोमोबाईल कंपन्या कोंबडी खाद्य बनवणाऱ्या कंपन्या, टेक्‍सटाईल आदी व्यवसाय आज अडचणीत आहेत. उद्योजकांची परिस्थिती सुमारे साठ टक्‍क्‍याने खालावल्याने उद्योग व्यवसाय अडचणीत आहेत. 

दक्षतेबाबत श्री. मालू म्हणाले,""कामगार वर्ग सतर्क आहे. सर्वजण आरोग्याची विशेष काळजी घेताना दिसतात. उद्योजकांच्या वतीने दक्षतेचे आव्हान करण्यात आले आहे. होळीच्या सुटीसाठी गेलेले परप्रांतीय कामगार परतले नाहीत. सध्या कोणतीही कामगार भरती होणार नाही. किरकोळ आजार उद्‌भवणाऱ्यांनी तो अंगावर काढता कामा नये. कोरोना फैलावाने झालेली जागतिक महामारी सावरण्यासाठी तसेच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आम्ही उद्योजक प्रशासनाच्या पाठीशी ठाम उभे आहोत. प्रशासनाचा प्रत्येक निर्णय आम्हाला मान्य आहे. 

आरोग्याची दक्षता बाळगून काम सुरू
कुपवाड-मिरज औद्योगिक क्षेत्रातील कामगार वर्गाची अंदाजित संख्या वीस ते पंचवीस हजार इतकी आहे. उद्योग बंद झाल्यास त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. सर्वत्र कोरोनाचे थैमान घातले आहे. अद्याप कामगार वर्गात कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत. आरोग्याची दक्षता बाळगून काम सुरू आहे. 
- शिवाजी पाटील, कुटुंबप्रमुख चेंबर ऑफ कॉमर्स 

हॉटेल-धाब्यावर ठणठणाट 
कोरोना जनजागृतीबाबत कामगारांच्या दक्षतेमुळे औद्योगिक क्षेत्रातील खाद्य ठिकाणे ओस पडली आहेत. नाश्‍ता जेवणासाठी वारंवार गर्दी करणाऱ्या कामगारांनी आता घरातूनच पोटभर डबे आणण्याचे ठरवल्याने हॉटेल-धाब्यावर ठणठणाट आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT