पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात 256 कोटींची एफआरपी थकवली

सकाळवृत्तसेवा

सांगली - जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी २५६ कोटी रुपयांची एफआरपी थकवली आहे. एफआरपी देणे तातडीने अशक्‍य असल्याचे कारखानदारांनी एका बैठकीत स्पष्ट केले आहे. एफआरपी ठरवताना राज्यनिहाय साखर दर निश्‍चित केला आहे, यापेक्षा कमी दराने साखर विक्रीवर कायद्याने निर्बंध आणण्याच्या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे साखर उद्योगाने साकडे घातले आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत दिल्लीत ३० मे रोजी बैठक होत आहे. साखरेचा किमान विक्री दर प्रतिक्विंटल तीन हजार रुपये करण्याचा निर्णय तीत होण्याची अपेक्षा आहे. 

हंगामाच्या सुरवातीला साखर प्रतिक्विंटल ३४०० रुपये होती. ती २४५० रुपयांपर्यंत घसरली. गाळप प्रारंभी कारखान्यांनी एफआरपी अधिक प्रतिटन २०० रुपये जादा दिले. साखर दरातील घसरणीने शेवटच्या टप्प्यात तुटलेल्या उसाचे पैसेही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. सद्या तर एफआरपी देणे अशक्‍य असल्याचे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील बैठकीत कारखानदारांनी स्पष्ट केले. येत्या हंगामासाठीच्या तरतुदीबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली.

हंगामाच्या सुरुवातीला ३००० रुपये नंतर २५०० प्रमाणे बिले मिळाली. शेवटच्या गाळपास एक रुपयाही मिळाला नाही. सर्वांसाठीच तोडग्याची गरज आहे.
विनायक पाटील
, काकडवाडी

पंतप्रधानांच्या उपस्थितीत ३० मे रोजी दिल्लीत बैठक होत आहे. ज्येष्ठ नेते व माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी हालचाली सुरु केल्यात. राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, ‘इस्मा’ चे अधिकारी वर्मा, राज्य साखर संघाचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांची बैठकीला उपस्थिती आहे. 
यंदा एफआरपी निश्‍चित करताना साखर दर प्रतिक्विंटल तीन हजार ते ३२०० रुपये होता. तो आता नाही. जीवनावश्‍यक वस्तू कायद्याप्रमाणे साखर विक्री प्रतिक्विंटल तीन हजारपेक्षा कमी दराने करू नये, असा निर्णय होण्याचा अंदाज आहे. 

कारखाना निहाय थकीत एफआरपी

  • कारखाना    एफआरपी    थकीत रक्कम (कोटी)
  • महाकांली    २३३३.६०    २३ 
  • वाटेगाव    २८७३.४१    १०
  • सोनहिरा    २८०५.५५    २८
  • क्रांती    २७७२.५०    ५८ 
  • विश्‍वास    २७८१.००    ३१
  • साखराळे    २८९२.५२    २१
  • हुतात्मा    ३०३०.९३    २२
  • माणगंगा    १९१७.००    १२
  • केन अँग्रो    २५३४.७९    १५
  • निनाईदेवी    २४२२.६०    ६
  • श्री श्री    १९३७.८०    २०
  • मोहनराव शिंदे    २४४१.५१    ००
  • दत्त इंडिया    १९९५.००    ००
  • सर्वोदय    २९२६.१२    १०
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT