sangli accident
sangli accident 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत भरधाव मोटार झाडावर आदळून 3 अभियंते ठार, 2 जखमी

सकाळवृत्तसेवा

सांगली : मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करून घरी परतताना भरधाव मोटार झाडावर आदळून विकी अंकुश चव्हाण (वय 24, यशवंतनगर, सांगली), सम्मेद भारत निल्ले (वय 21, जैन गल्ली, राधानगरी), निनाद राजेंद्र आरवाडे (वय 22, एस.टी. कॉलनी, विश्रामबाग, सांगली) हे तिघेजण ठार झाले. मोटार चालवणारा नितांत राजन बुटाले (वय 26, पत्रकारनगर, सांगली), सुनिल महावीर मडके (वय 22, कवठेपिरान, ता. मिरज) हे दोघेजण जखमी झाले. मध्यरात्रीनंतर पावणे दोन वाजता कर्मवीर चौकात जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसमोर अपघात झाला. मृत सम्मेद आणि निनाद एकुलते होते. सम्मेद हा लठ्ठे पॉलिटेक्‍निकमध्ये डिप्लोमाला तिसऱ्या वर्षात होता. तर निनाद उत्तीर्ण होऊन दिल्लीत नुकताच नोकरीनिमित्त गेला होता. विकी हा पुणे येथे "बीबीए' शिकत होता. 

अधिक माहिती अशी, विकी, सम्मेद, निनाद आणि वृषभ असे चौघेजण खास मित्र होते. वृषभ बाहेरगावी गेला होता. सम्मेद शिक्षणानिमित्त सांगलीतच होता. विकी व निनाद सांगलीत आले होते. तिघांपैकी एकाचा वाढदिवस असल्यामुळे काल (ता. 6) रात्री पार्टी करण्याचे ठरवले. रात्री वानलेसवाडी येथील खवय्या हॉटेलमध्ये तिघेजण जमले. तिघांचा आणखी एक मित्र नितांत बुटाले याचाही त्यांच्या ग्रुपमध्ये सहभाग असायचा. नितांत हा कंत्राटदार म्हणून कामे करतो. काल सायंकाळी तो आणि सुपरवायझर सुनिल मडके हे दोघेजण मोटार (एमएच 02 एवाय 491) मधून बांधकामाची खडी आणण्यासाठी टोप संभापूर (जि. कोल्हापूर) परिसरात गेले होते. पाच-सहा क्रशरवर खडी बघितली. त्याचवेळी नितांतला तिघापैकी एका मित्राचा मोबाईलवर कॉल आला. वाढदिवसाच्या पार्टीचा निरोप मिळाल्यानंतर रात्री नितांत, सुनिल सांगलीत परतले. 

खवय्या हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत पाचजणांची पार्टी रंगली. गप्पा टप्पा मध्यरात्री दीडपर्यंत सुरू होत्या. पावणे दोन वाजता नितांतच्या मोटारीतून सर्वजण सांगलीत येण्यास निघाले. नितांत मोटार चालवत होता. शेजारीच सुनिल बसला होता. तर विकी, सम्मेद, निनाद मागच्या सीटवर बसले होते. नितांत भरधाव वेगाने मोटार चालवत होता. मार्केट यार्डासमोरील गतिरोधकावरून तर मोटार वेगाने उचलली जाऊन खाली आदळली. वेगावर नियंत्रण न ठेवता मोटार पुढे नेली. त्यानंतर कर्मवीर चौकाच्या अलिकडे जिल्हा बॅंकेसमोर रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या गुलमोहारच्या झाडावर मोटार जोराने आदळली. वेग इतका भयानक होता की धडकेनंतर मोटार पूर्णपणे मागे फिरली. पाठीमागची दरवाजाची बाजू पाच-सहा फुटावर उचलली जाऊन झाडावर आदळली. दरवाजाचा चक्काचूर होऊन मागे बसलेले तिघेजण एकमेकावर आदळून डोक्‍यास गंभीर दुखापत झाली. मोटार चालवणारा नितांतही जखमी झाला. शेजारी बसलेला सुनिल किरकोळ जखमी झाला. 

मध्यरात्रीनंतर पावणे दोन वाजता अपघाताच्या धडकेचा आवाज ऐकून बॅंकेच्या शेजारी राहणारे नागरीक जागे झाले. पोलिस नियंत्रण कक्षास कोणीतरी प्रकार कळवला. तेथून विश्रामबाग पोलिसांना माहिती दिली. गस्तीची मोटार काही मिनिटातच घटनास्थळी आली. पोलिस निरीक्षक राजेंद्र मोरे आणि पोलिस तत्काळ धावले. तेथील चित्र भयानक होते. मोटार झाडावर आदळल्यानंतर शेजारील चरीत अडकली होती. पोलिस आणि नागरिकांनी जखमींना बाहेर काढले. निनादला मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये नेले. विकी, सम्मेद, नितांतला सिव्हीलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असतानाच निनाद, विकी, सम्मदेचा मृत्यू झाला. नितांत गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सुनिल किरकोळ जखमी झाला आहे. अपघातानंतर पोलिसांनी पंचनामा केला. मोटार पोलिस ठाण्यात आणली. चालक नितांत याच्यावर गुन्हा नोंदवला जाणार असल्याचे सांगितले. 

भीतीने मोटार पळवली
विश्रामबाग चौकात पोलिसांनी भरधाव मोटारीला हात केला. परंतू मोटार थांबली नाही. त्यानंतर पोलिस पाठलाग करतील या भितीने मोटार वेगाने पळवली आणि अपघात झाल्याची चर्चा अपघातानंतर रंगली होती. मात्र ही केवळ चर्चाच होती. विश्रामबागचे निरीक्षक राजेंद्र मोरे यांना याबाबत विचारले असता ही अफवा असल्याचे सांगितले. पोलिसांनी कोणालाही थांबवले नाही की पाठलाग केला नाही असे ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: नैनीतालमधील वणवा आटोक्यात आणण्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टरची मदत; व्हिडिओ समोर

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT