कुरळप ः येथे पोलिसांनी संशयितांसह जप्त केलेला सुगंधी तंबाखू.
कुरळप ः येथे पोलिसांनी संशयितांसह जप्त केलेला सुगंधी तंबाखू. 
पश्चिम महाराष्ट्र

येलूर फाट्याजवळ २३ लाखांचा सुगंधी तंबाखू जप्त

सकाळवृत्तसेवा

कुरळप - पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर येलूर फाटा येथे कुरळप पोलिसांची नाकेबंदी सुरू असताना हुबळीहून राजस्थानकडे जाणाऱ्या टेम्पोचा संशय आल्याने चौकशी केली असता त्यात २३ लाखांची सुगंधी तंबाखू (सुपारी) असल्याचे निदर्शनास आले. वाहनचालक इरनगौंड शिवमगौंड फकिरगोर (वय २८) व शिवगौंड हिरनगौंड चिकनगौर (२१) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना अटक करून जप्त मुद्देमाल अन्नऔषध प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आला. २३ तंबाखू व अंदाजे १२ लाखांचे वाहन असा ३५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कुरळप पोलिसांत नोंद झाली आहे. काल (ता. ९) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही कारवाई झाली. 

पोलिसांनी माहिती दिली, की हुबळीहून राजस्थानकडे सुगंधी सुपारीची वाहतूक करणारा टेम्पो (केए २५- एए- १७८९) हा येलूरच्या हद्दीत कुरळप पोलिसांतर्फे नाकाबंदी होत असताना टेम्पोतील सुगंधी सुपारीचा पोलिसांना वास आल्याने चौकशी करण्यात आली. गुटख्यासारख्या सुगंधी सुपारीची पोती आढळून आल्याने पोलिसांनी घटनेची नोंद करून अन्न व औषध प्रशासन विभागाकडे साहित्य सुपूर्द केले.

कारवाई करून टेम्पो ताब्यात घेण्यात आला. वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी डी. एच. कोळी, नमुना सहायक टी. के. कवळे, सी. एम. साबळे यांनी कारवाई केली. कुरळप पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विवेक पाटील, पोलिस नाईक अनिल पाटील, विकास शिंदे, शरद पाटील, दीपक सदामते, भूजन महाडिक, संजय पाटील आदी नाकाबंदी करीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT