पश्चिम महाराष्ट्र

सांगली शहरातील फूटपाथाची दुरवस्था, अतिक्रमणांचा विळखा

शंकर भोसले

सांगली - शहरातील पादचाऱ्यांसाठी राखीव असलेले फूटपाथ अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेत. काही ठिकाणी फूटपाथच्या मधोमध असलेली उघडी  ड्रेनेज अपघातास निमंत्रण देत आहेत. सारे रस्ते, फूटपाथ अतिक्रमणाने व्यापलेत. अतिक्रमण करण्याची स्पर्धाच रंगली आहे. मात्र महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सोयीस्कर दुर्लक्ष होत सल्याची तक्रार आहे. 

पटेल चौकात फूटपाथवर दुकानदारांनी साहित्य मांडले आहे. आझाद चौकातून काँग्रेस भवनकडे जाणाऱ्या फूटपाथवर दुचाकीधारकांनी कब्जा केल्याचे चित्र आहे. राममंदिर चौक, सिव्हिल हॉस्पिटल येथेही तीच स्थिती आहे. स्टेशन चौक ते राजवाडा चौक येथील फूटपाथच्या मधोमध उघडी ड्रेनेज रात्री अपघातास कारणीभूत ठरत आहेत. 

महापालिकेतील अधिकारी, कारभारी, पदाधिकारी उघड्या डोळ्याने हे पाहत आहेत. ठोस कारवाई केली जात नाही. कारभारी, पदाधिकाऱ्यांना मतांची काळजी तर महापालिका प्रशासनाची उदासीनता यामुळे शहर पुन्हा अतिक्रमणात सापडलेय. शहरातील कोणतीच अतिक्रमणे दिसत नसतील तर ते नवलच म्हणावे लागेल. आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी पदभार स्वीकारला तेव्हा  शहरातील फूटपाथांवरील अतिक्रमणांवर कारवाई केली. मात्र अतिक्रमण विभागाची कारवाई म्हणजे अतिक्रमणे करा, दंड भरा  आणि पुन्हा जैसे थे अतिक्रमण करा, अशी स्थिती  शहरात सर्वत्र आहे.  

वाहतूक विभागाचे दुर्लक्ष
शहरातील नो पार्किंग, वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईसाठी वाहतूक विभागाची क्रेन कार्यरत आहे. ती शहरात सकाळी व सायंकाळी दिसते. अन्यवेळी ती दिसत नाही. रात्री फूटपाथवरून  जाणेदेखील दुरापास्त झाले आहे. क्रेनची कारवाई थंडावल्याचे चित्र आहे. वाहने फूटपाथवर नो पार्किंग जागेत राजरोस उभी असतात.

येथे फूटपाथची दुरवस्था...
काँग्रेस भवन रस्त्यावरील हॉटेल नवरत्नजवळ पेव्हिंग ब्लॉकची दुरवस्था झाली आहे, तर सिव्हिलकडे जाणाऱ्या फूटपाथचे अस्तित्व नाहीसे झाल्याचे चित्र आहे. उलट स्टेशन चौकातील फूटपाथांची अवस्था आहे. संरक्षणासाठी लावलेल्या पाईप निखळल्या आहेत, तर काही पाईप्स चोरीस गेल्या आहेत. पटेल चौकात रस्त्यांच्या दोन्ही बाजूला दुकान व्यावसाियक, दुचाकीस्वारांनी कब्जा केला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT