पश्चिम महाराष्ट्र

मिरज तालुक्‍यात तीन नवी महसुली गावे

संतोष भिसे

मिरज - तालुक्‍यात तीन नव्या महसुली गावांची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. शासनाने नुकतीच तशी अधिसूचना जारी केली. कवठेपिरान हद्दीत गवे व सिद्धेश्‍वर व दुधगाव हद्दीत आंबोळे ही ती गावे आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील गावांची संख्या ७५ झाली आहे. 

नवी गावे धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेली आहेत. शिराळा तालुक्‍यात चांदोली धरणामुळे आणि अभयारण्यामुळे गवे, सिद्धेश्‍वर आणि आंबोळे ही गावे विस्थापित झाली. त्याचे शासनाने कवठेपिरान व दुधगाव हद्दीत पुनर्वसन केले. बरीच वर्षे ती वसाहत होती. स्वतःचे महसुली  हक्क नव्हते. स्वतंत्र मान्यतेसाठी त्यांनी पाठपुरावा केला. शासनाने मान्यता दिली. नवी नावे न देता मागणीनुसार जुनीच कायम ठेवली. त्यांचा तालुका ‘शिराळा’ ऐवजी ‘मिरज’ झाला. 

तालुक्‍यातील महसुली गावांची संख्या ७५ झाली. सध्या ६४ ग्रामपंचायती आणि आठ महसुली गावे आहेत. वॉन्लेसवाडी, कुपवाड ही गावे महापालिका क्षेत्रात  गेल्याने ग्रामपंचायत बरखास्त झाली. तलाठी सज्जे कायम आहेत. निलजी, बामणी या गावांसाठी एकच ग्रुप ग्रामपंचायत आहे. सांगली, मिरज, कुपवाड,  वॉन्लेसवाडी, निलजी किंवा बामणी, व्यंकोचीवाडी आणि नावरसवाडी ही गावे आणि ६४ ग्रामपंचायती असा ७२ गावांचा पसारा आहे. त्यात नव्याने गावे वाढल्याने संख्या ७५ झाली.

गावे नवी, कारभार जुन्या ग्रा. पं. मार्फत
नव्या गावांना महसुली दर्जा मिळाला असला तरी स्वतंत्र ग्रामपंचायती नाहीत. कवठेपिरान, दुधगावमध्येच ती आहेत. रस्ते, स्मशानभूमी, गुरे चरण्याची कुरणे आदींचा वापर करण्याचे अधिकार नव्या गावांना दिले आहेत. अन्य सर्व मूलभूत नागरी सुविधाही वापरता येतील. मतदानाचा अधिकार असेल. स्वतंत्र तलाठी किंवा ग्रामसेवक सज्जा नाही. शासन निर्णयानुसार सांगलीचे अपर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी तशी अधिसूचना जारी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT