पश्चिम महाराष्ट्र

शस्त्र तस्करी रॅकेटमध्ये परप्रांतीय ‘कनेक्‍शन’चे आव्हान

बलराज पवार

सांगली - स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गेल्या पंधरा दिवसांत चार पिस्तूल तस्कर पकडले  आहेत. त्यांच्याकडून आतापर्यंत २६ अग्निशस्त्रे आणि ६७ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. यातील मध्यप्रदेशातील लालबाग गावातून चार दिवसांपूर्वीच काही शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. जिल्ह्यात दोन महिन्यांत झालेल्या खुनांच्या पार्श्‍वभूमीवर असे पिस्तूल शहरात  येऊ लागले तर ते पोलिसांना आव्हान ठरणार आहे. त्यातही परप्रांतीय कनेक्‍शन आव्हानात्मक ठरणार आहे.

सांगली पोलिसांनी गेल्या पाच वर्षांत सुमारे सव्वाशेहून अधिक पिस्तुले-रिव्हॉल्व्हर आणि जिवंत काडतुसे जप्त करण्याची कारवाई केली आहे. काही वर्षांपूर्वी डॉ. दिगंबर प्रधान यांच्या नेतृत्वाखालील  पथकाने उत्तर प्रदेशमधून अशी पिस्तूल जप्त करून आणण्याची कामगिरी केली होती. तर यंदा स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेशमधून पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या राज्यांतून गुन्हेगारी विश्‍वाला पिस्तूल, रिव्हॉल्व्हरची रसद मिळते हे स्पष्ट होते.

देशी बनावटीच्या शस्त्रांचे कारखानेच 
मध्य प्रदेश, बिहार-उत्तरप्रदेशसारख्या राज्यांत काही हजार रुपयांत पिस्तूल मिळतात. अग्निशस्त्रे अर्थात पिस्तूल, रिव्हॉल्व्हर तयार करण्याचे  कारखानेच या राज्यात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे देशी बनावटीची हत्यारे तेथे सहज उपलब्ध होतात. त्यामुळे त्यांचा बाजारही खुला असतो. हल्ली तेथेही पोलिसांनी कारवाया केल्याने या शस्त्रांच्या बाजारपेठांवरही संक्रांत आल्याचे अधिकारी सांगतात. तरीही अजून तेथे ही शस्त्रे कमी पैशात उपलब्ध होत असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईवरून लक्षात येते. तस्कर अवघ्या पाच-दहा हजारांत तेथे पिस्तुले  मिळवतात. 
ती पुढे विविध भागांतील ग्राहक शोधून  ५० ते ६० हजार रुपयांत सौदा होतो. अर्थात हे ग्राहक  म्हणजे गुन्हेगारच असणार हे उघड आहे. कारण अशा पिस्तुलांना परवाना कोण घेणार? आणि प्रशासन ते देणारही नाही. त्यामुळेच तस्करांच्या माध्यमातून गुन्हेगारी विश्‍वापर्यंत ही पिस्तुले पोहोच होतात.

खरेदीदारांचाही शोध व्हावा
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोन कारवाईत वेळीच शस्त्रे जप्त केल्यामुळे भविष्यातील अनर्थ टळला आहे खरा, परंतु ही शस्त्रे कोण घेणार होते ? कोणत्या टोळीतील होते ? याचाही शोध लागला पाहिजे. शंभर  फुटी रस्त्यावर साताराच्या दोघा तस्करांना पोलिसांनी पकडले होते. त्यांच्याकडून मध्य प्रदेशमधील तस्करांची लिंक मिळाली. पण, सांगलीत कुणाला पिस्तूल विकणार होते ? गेल्या दोन महिन्यांत पाच खून झाले आहेत. यामध्ये दोन टोळीयुद्धातून होते. तर एक सुपारी देऊन झाला होता. या पार्श्‍वभूमीवर सापडलेली ही पिस्तुले  कुणी मागवली होती हे स्पष्ट होणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT