Sharad Pawar Ajit Pawar Jayant Patil esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Politics : जयंत पाटलांना मोठा धक्का! 'हे' प्रमुख पदाधिकारी अजितदादांच्या गोटात; सांगलीचं बदलणार राजकारण?

लवकरच विट्यातून अजित पवारांचा सांगली दौरा होणार

सकाळ डिजिटल टीम

माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी अजित पवारांसोबत गेल्याने ते आता राष्ट्रवादीचे आणखी नगरसेवक अजित पवार गटात येण्यासाठी पुढाकार घेण्याची शक्यता आहे.

सांगली : विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, तसेच सांगलीचे माजी नगरसेवक पद्माकर जगदाळे यांनी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुंबईत झालेल्या बैठकीत उपस्थिती लावून आपण त्यांच्या गटात असल्याचे संकेत दिले आहेत.

याबरोबरच माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, योगेंद्र थोरात यांचीही उपस्थिती होती. यावेळी 'तुम्ही एकसंध राहा, मी सांगलीच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावतो' असे आश्वासन अजित पवार यांनी दिल्याचे समजते. तसेच लवकरच विट्यातून अजित पवारांचा सांगली दौरा होणार असल्याचेही समजते.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपण शरद पवार यांच्या सोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात शरद पवार गट भक्कम राहील, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, काल मुंबईत झालेल्या अजित पवार यांच्या बैठकीत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, इद्रिस नायकवडी, पद्माकर जगदाळे, विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली.

बैठकीत वैभव पाटील, पद्माकर जगदाळे, योगेंद्र थोरात यांनी आपली मते अजित पवारांसमोर मांडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी 'तुम्ही सर्व एकसंध राहा, सांगलीची विकास कामे, प्रकल्पांचे प्रस्ताव माझ्याकडे द्या, मी संबंधित विभागांशी चर्चा करून ते मार्गी लावतो, असे आश्वासन दिल्याचे समजते. बैठकीस तासगाव, कवठेमहांकाळ, विटा, वाळवा तालुक्यांतील अनेकजण उपस्थित होते, असे समजते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही उपस्थित होते.

महापौरपदाची मुदत संपताच सूर्यवंशींची उडी!

दिग्विजय सूर्यवंशी यांनी आपण जयंत पाटील आणि शरद पवार यांच्यासोबत असल्याचे महापौर असताना स्पष्ट केले होते. मात्र, मुदत संपल्यानंतर दोनच दिवसांत त्यांनी अजित पवार गटाच्या बैठकीला उपस्थिती लावून जयंत पाटील यांचे साथ सोडल्याचे संकेत दिले आहेत. माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी अजित पवारांसोबत गेल्याने ते आता राष्ट्रवादीचे आणखी नगरसेवक अजित पवार गटात येण्यासाठी पुढाकार घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी लवकरच अजित पवार बैठक घेतील, अशी चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT