sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : जिल्हा बँक निवडणूक लढविण्याची सेनेची डरकाळी

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक स्वबळावर आणि ताकदीने लढवली जाईल, अशी घोषणा माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी केली.

सकाळ वृत्तसेवा

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक स्वबळावर आणि ताकदीने लढवली जाईल, अशी घोषणा माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी केली. जिल्हा प्रमुख संजय विभूते आणि आनंदराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक झाली. विभूते म्हणाले, ‘‘जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी चांगली झालेली आहे.

त्यामुळे सहकार क्षेत्रात काम करणारे भरपूर पदाधिकारी आणि कार्यकर्ते तयार झालेले आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीनुसार येणारी जिल्हा बँकेची निवडणूक शिवसेना मोठ्या ताकदीने लढण्याची तयारी करणार आहे. आज अखेर आमच्याशी कोणत्याही समविचारी पक्षाने संपर्क केलेला नसून लवकरच वरिष्ठांच्या कानावर ही बाब घालून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढीलप्रमाणे रणनीती तयार केली जाईल.’’

जिल्हा प्रमुख पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हा बँक निवडणुकीसाठी गठीत करण्यात आलेली कोअर कमिटी प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी यांच्या बैठका घेऊन जिल्हा बँकेच्या निवडणुकीची तयारी करेल, असे बैठकीत ठरले.

जिल्हा संघटक बजरंग पाटील, गुंठेवारी समिती प्रदेश प्रमुख चंदन चव्हाण, उपसंघटक साहेब पाटील, उपजिल्हा प्रमुख अविनाश पाटील, सुभाष मोहिते, नंदकुमार नीळकंठ, महादेव मगदूम, विधानसभा क्षेत्र प्रमुख नानासाहेब शिंदे, अरुण खरमाटे, हरिदास लेंगरे, डॉ. किशोर ठाणेकर, तासगाव तालुका प्रमुख प्रदीप पाटील, जत तालुका प्रमुख अंकुश हुवाळे, कडेगाव तालुका प्रमुख नितीन शिंदे, पलूस तालुका संघटक शिवाजी पवार, तासगाव तालुका संघटक जयवंत माळी, कुपवाड शहर प्रमुख रुपेश मोकाशी, मिरज शहर प्रमुख विजय शिंदे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT