Sangli News
Sangli News sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli News: विद्यार्थ्याने चार्जिंगवर धावणारी अफलातून सायकल बनविली

सकाळ वृत्तसेवा

वांगी कडेगाव : येथील सुशांत दत्तात्रय मेटकरी या सोळा वर्षांच्या विद्यार्थ्याने चार्जिंगवर धावणारी अफलातून सायकल बनविली आहे. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने स्वत: मजुरी करून पैसे जमवून सुशांतने उपजत कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर केलेल्या या जुगाडाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

- रवींद्र मोहिते

वडील दत्तात्रय मेटकरी आणि आई सुजाता दररोज मजुरीला गेल्याशिवाय चूल पेटत नाही. अजिबात शेतजमीन नाही. छप्परवजा घरात हे कुटुंब वास्तव्यास आहे. सुशांत हायस्कूलमध्ये नववीत शिकत असताना चार्जिंग सायकलची कल्पना त्याच्या डोक्यात आली. मात्र त्यासाठी आवश्यक पैसे स्वतः उभारण्याचा निर्धार केला.

दर शनिवार आणि रविवारी वडिलांसोबत कामाला जाऊन दहावीची परीक्षा देईपर्यंत त्याने ८ हजार रुपये मजुरीतून साठविले. दहावीनंतरच्या सुटीत त्याने या सायकलच्या जुगाड निर्मितीस सुरवात केली. इंटरनेटच्या मदतीने मध्य प्रदेशमधून साडेसहा हजार रुपये किमतीची २४ व्होल्टवर चालणारी छोटी इलेक्ट्रिक मोटर मागविली.

स्थानिक बाजारातून १२ व्होल्टच्या दोन बॕटऱ्या खरेदी केल्या. त्यासाठी एक हजार पाचशे रुपये खर्च झाले. सायकलच्या मागील चाकाशी या उपकरणांची जोडणी करून सांगड घातली आणि ही सायकल विनासायास धावू लागली.

सध्या तो गावापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या भारती विद्यापीठाच्या श्रीपतराव कदम महाविद्यालयात व्यवसाय प्रशिक्षणाच्या ११ वी वर्गात इलेक्ट्रिक शिकत आहे. ही बॕटरी एकदा तासभर चार्जिंग केल्यावर सायकल ५० किलोमीटर धावत आहे. सुशांत याच सायकलवरून जाऊन शिक्षण घेत आहे. सुशांतच्या या बुद्धिमत्तेचे अप्रुप होत असून त्याच्या पाठीवर आर्थिक शाबासकीची थाप पडण्याची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT