Two-wheeler theft
Two-wheeler theft  esakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली शहर रोज सरासरी दोन दुचाकी होताहेत गायब

राजेश नागरे

सांगली : शहर आणि उपनगर परिसरात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज सरासरी दोन दुचाकी शहर परिसरातून चोरीस जाऊ लागल्या आहेत. चोरट्यांनी शहर, विश्रामबाग, संजयनगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकासमोर आव्हान उभे आहे.घरासमोर लावलेली दुचाकी रात्रीतून गायब करण्याचे प्रकार गेल्या वर्षभरापासून वाढलेले आहेत. शहर व उपनगरांतील दुचाकी चोरींचे प्रमाण पाहिले तर रोज सरासरी दोन दुचाकी चोरीला जातात.

घरासमोरून; तसेच बाजारात लावलेल्या दुचाकी सहजपणे चोरीला जात असल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. सध्या दुचाकीच्या किमती लाखापर्यंत पोहोचल्या आहेत. अशावेळी पहिली दुचाकी चोरीस गेल्यानंतर दुसरी दुचाकी घेणे सहज आणि सोपे राहिले नाही. तसेच चोरीस गेलेल्या दुचाकीचा विमा नसेल तर भरपाई मिळणे देखील मुश्‍किल बनते.

गेल्या वर्षभरापासून दुचाकी चोरींचे वाढते प्रमाण पाहिले तर या चोरीच्या दुचाकी जातात कोठे, असा प्रश्‍न निर्माण होतो. वाहनांचे सुटे भाग करून ती विक्री करणारी यंत्रणा कार्यरत असली पाहिजे. शहरातील काही भंगार व्यावसायिक अशा प्रकारच्या चोरीच्या दुचाकी स्क्रॅपमध्ये काढण्यात गुंतल्याची शक्यता आहे. दुचाकी चोरांच्या एक, दोन नव्हे तर जास्त टोळ्या असल्याची शक्यता आहे.

शहर, विश्रामबाग, संजयनगर पोलिसांनी; तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने दुचाकी चोरीचे काही गुन्हे उघडकीस आणले आहेत. परंतु चोरीस जाणाऱ्या दुचाकी आणि गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण पाहिले तर त्यात मोठी तफावत आहे. ती कमी करण्याची गरज आहे. त्याचबरोबर दुचाकीच्या मालकांनी सध्या टायर लॉक, साखळी लॉक अशा एकापेक्षा जास्त पर्यायाचा वापर करण्याची आवश्‍यकता आहे.

एका दिवसात चार दुचाकी गेल्या

शहर, विश्रामबाग आणि संजयनगर पोलिस ठाणे हद्दीत चार दुचाकी चोरीस गेल्याचे गुन्हे रविवारी दाखल झाले. त्यामुळे आता पोलिसांनी आणखी दक्ष होण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT