Rupee_ATM
Rupee_ATM 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली अर्बन बॅंकेचे सहा कोटी रुपये ताब्यात

सकाळवृत्तसेवा


सांगली : सांगली अर्बन बॅंकेची सहा कोटी रुपये घेऊन जाणारी बोलेरो गाडी आज तुळजापूर (जि. उस्मानाबाद) येथे पोलिसांनी ताब्यात घेतली. ही गाडी अर्बन बॅंकेची असून यामध्ये बॅंकेच्या मराठवाड्यातील शाखांमधून जमा झालेली रक्कम असल्याचे बॅंकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी सांगितले.


उस्मानाबाद जिल्ह्यात आचार संहितेमुळे गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये बोलेरो गाडीतून सहा कोटी रुपये एवढी मोठी रक्कम घेऊन जात असताना तुळजापूरजवळ पोलिसांनी गाडीची तपासणी केली. यामध्ये सदरची रक्‍कम आढळून आल्याने ती चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली.
सदरची गाडी सांगली अर्बन बॅंकेची असून गाडीत बॅंकेचे व्यवस्थापक, क्‍लार्क, शिपाई आदी होते. त्यांच्याकडेही चौकशी करण्यात येत आहे. उस्मानाबाद पोलिसांकडून ही चौकशी सुरु आहे.
याबाबत बॅंकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी सांगितले की, सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी आणल्यानंतर गेल्या चार पाच दिवसात बॅंकांमध्ये मोठ्याप्रमाणात रक्कम गोळा झाली होती. एवढी मोठी रक्कम शाखांमधून ठेवता येणे शक्‍य नव्हते. त्यामुळे ती सांगलीला मुख्य शाखेत आणण्यात येत होती. तुळजापूरजवळ आचारसंहितेमुळे पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली. गाडी बॅंकेचीच आहे. यामध्ये बॅंकेचे कर्मचारी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सह्याद्रीचा माथा : नाशिकचा चक्रव्यूह कोण, कसा भेदणार? 

सोलापूरमध्ये रमेश कदमांची भूमिका ठरणार निर्णायक? २८ एप्रिलच्या मेळाव्याकडे जिल्ह्याचं लक्ष

US Green Card : देश सोडून भारतीय बाहेर का जात आहेत?

Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य - धागा श्रद्धेचा जपावा लागणार!

दृष्टिकोन : राजेशाही, हुकूमशाही अन् लोकशाही

SCROLL FOR NEXT