पश्चिम महाराष्ट्र

रानभाज्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा; विश्वजित कदम

मंत्री डॉ. विश्वजित कदम : रानभाज्या महोत्सवाचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा

सांगली : पावसाळ्यात विविध गुणधर्म असणाऱ्या अनेक वनस्पती उगवतात. त्यातील अनेक वनस्पती खाण्यायोग्य असतात त्यांना आपण रानभाज्या म्हणून ओळखतो. त्यातील काही रानभाज्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त व औषधीही असतात. अशा रानभाज्यांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषि विभागाने आयोजित केलेला रानभाज्या महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी रानभाज्यांची चवही चाखली.

विजयनगर येथे आत्मा सभागृहात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रानभाज्या महोत्सवाचे उद्‌घाटन सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते झाले. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पृथ्वीराज पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, कृषी उपसंचालक प्रभाकर पाटील, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम उपस्थित होते.

डॉ. कदम म्हणाले,‘‘राजभाज्यांचे महत्त्व सर्वसामान्यापर्यंत जाण्यासाठी अशा महोत्सवांची व्याप्ती वाढवावी. रानभाजी महोत्सव शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी आयोजित करण्यात यावेत यामुळे रानभाज्यांना चांगले मार्केट लाभेल. डॉ. कदम यांनी रानभाज्यांच्या प्रत्येक स्टॉलवर जावून भाज्यांची माहिती घेतली तर काही भाज्यांची चवही चाखली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी महोत्सव आयोजनाबाबत महत्त्व सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Farmer Loan Waiver : कर्जमुक्ती योजनेत 65 हजार शेतकरी पात्र; 35 हजार जणांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण, पहिल्या टप्प्यातील यादी प्रसिद्ध

Mumbai News: १० वर्षांच्या मुलाच्या पोटातून काढले एक किलो चुंबक, डॉक्टरांनी वाचवला जीव; गंभीर आजाराने ग्रस्त

Latest Marathi News Live Update : इंग्रज फक्त केसरी आणि द मराठा या वृत्तपत्रांना घाबरायचे : अमित शहा

पंतप्रधान १०० टक्के योग्यच, पण दुसऱ्यांनाही आया असतात; १२ वर्षे तुमच्या लोकांनी केलं त्याची माफी कोण मागणार, राज ठाकरेंचा सवाल

Nashik Municipal Corporation : 'लोकांच्या असंतोषाची परीक्षा पाहू नका, इतिहास आपल्या समोर आहे'; मंत्री छगन भुजबळ यांनी कोणावर साधला निशाणा?

SCROLL FOR NEXT