Crime News
Crime News sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli : विजय ताड हत्येप्रकरणी दोघांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

जत : येथील माजी नगरसेवक विजय शिवाजीराव ताड (वय ४२) यांच्यावर गोळीबार करीत व दगडाने ठेचून हत्या केल्या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संदीप ऊर्फ बबलू शंकर चव्हाण व एक अनोळखी साथीदार यांच्यावर बेकायदेशीर विनापरवाना शस्त्राचा वापर करणे व हत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाला. यामागील कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या प्रकरणी विजय ताड यांचे मोठे बंधू विक्रम ताड यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नगर परिषदेच्या एका माजी उपनगराध्यक्षाने विजय ताड यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता. त्यामुळे विजय ताड आणि त्यांच्यात राजकीय संघर्ष सुरू होता. यातून दोघांत वाद होता, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, याचा मुख्य खुलासा पोलिसांकडून झालेला नाही.

त्यामुळे हे प्रकरण पोलिसांच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरले आहे. हा तपास जत पोलिसांकडे न देता सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला असून, आरोपीच्या शोधात तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.विक्रम ताड यांनी दिलेल्या फिर्यादीत संदीप ऊर्फ बबलू चव्हाण आणि अन्य साथीदाराने गोळ्या झाडून व दगडाने ठेचून हत्या केल्याचे म्हटले आहे.

गेल्या १५ दिवसांपासून संदीप चव्हाण हा शाळा परिसरात वावरत होता. यामुळे पाळत ठेवून हा खून केला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे संशयित आरोपी चव्हाण याच्या अटकेनंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.

बबलू रेकॉर्डवरील गुन्हेगार

मृत विजय ताड हत्या प्रकरणातील संशयित बबलू चव्हाण यांच्यावर यापूर्वी बेकायदेशीर जमाव जमविणे, मारामारी करणे, धमकी देणे, यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे अन्य साथीदार किती आहेत, हे अटकेनंतरच स्पष्ट होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: कर्नाटकात 28 जागांपैकी आम्ही 25 जागा जिंकणार- बीएस येडियुरप्पा

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

SCROLL FOR NEXT