Sanglikars are almost ready for marriage
Sanglikars are almost ready for marriage 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीकरांची घटस्थापनेच्या तयारीची लगबग 

विष्णू मोहिते

सांगली : कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या शारदीय नवरात्र उत्सवाला शनिवार (ता. 17) पासून प्रारंभ होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून बाजारपेठेवर कोरोनाचे सावट असताना बाधित रुग्णांची संख्या आटोक्‍यात येत आहे. त्यामुळे शुक्रवार दिवसभर बाजारपेठेत नवरात्र तयारीसाठी रस्त्यावर गर्दी होती. सायंकाळी मारुती चौक, विश्रामबाग परिसरासह इतर भागात रस्ते गर्दीने फुलले होते. मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सचे भान ठेवून ग्राहक व विक्रेत्यांचा व्यवहार सुरु असल्याचे चित्र होते. 

यंदा गुढीपाडव्यापासून सुरु असलेले कोरोना विषाणूचे शुक्‍लकाष्ठ सर्वच सण समारंभावर परिणाम घडवून गेले. गणेशोत्सवही जेमतेम साजरा झाला. सार्वजनिक मंडळांनी प्रथमच मुर्ती प्रतिष्ठापनेला बगल देत साध्या पध्दतीने उत्सव साजरा केला. त्यानंतर आलेल्या नवरात्रोत्सवावरही कोरोनाचा परिणाम जाणवतो आहेच. मात्र कोरानाने मृत्युमुखी पडणारी संख्या व नवे बाधित रुग्ण यात उतार येत आहे. गेल्या आठवड्यापासून यात कमालीचा फरक जाणवत असल्याने दिलासा मिळत आहे. 

शहरात काही ठिकाणी नवरात्रीचा उत्साह दांडगा असतो. गरबा, दांडिया उत्तरोत्तर रंगत जातो. सार्वजनिक मंडळांमार्फत देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करुन नऊ दिवस भक्‍तिभावाने हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. त्याप्रमाणे गेल्या आठवड्यापासून काही ठिकाणी मंडप उभारणीची तयारी सुरु होती. 

पूजा साहित्याला मागणी 
शनिवारी घटस्थापनेसाठी लागणाऱ्या पूजा साहित्य तसेच उपवासाचे पदार्थ खरेदीसाठी बाजारात गर्दी होती. माती, झेंडू फुले, विविध धान्ये, मडकी, रांगोळी, पत्रावळी, सुगड, धूप, अगरबत्ती यासह पूजा साहित्याला उठाव होता. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सांगली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT