karmala
karmala 
पश्चिम महाराष्ट्र

करमाळ्यात नारायण पाटील आणि 'वंचित'च्या कार्यकर्त्याला मारहाण 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : दहिवली (ता. माढा) येथे अपक्ष आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांच्या मतदान प्रतिनीधीला मतदान केंद्रातच मारहाण केली आहे. याबाबत संबंधीतीवर गुन्हा दाखल करण्याण्याची मागणी अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी वंचीत आघाडीचे उमेदवार अतुल खुपसे यांच्या कार्यकर्त्यांलाही मारहाण करण्यात आली असल्याचे खुपसे यांनी सांगितले आहे

अपक्ष उमेदवार नारायण पाटील आणि संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली नंतर मारहाण झाली आहे. संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे. या मारहाणी नंतर मतदान केंद्रावर नारायण पाटील तात्काळ हजर झाले.

संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांची दडपशाही सुरू असल्याचा आरोप करत नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मतदान प्रकिया थांबविली होती. पण प्रशासनाने योग्य वेळी हस्तक्षेप केल्यामुळे मतदान सुरू झाले आहे.

दहिवली हे गाव माढा तालुक्यात असले तरी ते करमाळा विधानसभा मतदार संघात आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांना शिवसेना पक्षाने उमेदवारी नाकारल्या मुळे ते अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. तसेच संजय शिंदे हे देखील अपक्ष निवडणूक लढवीत आहेत..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT