The sarpanch should be the one to take everyone along
The sarpanch should be the one to take everyone along 
पश्चिम महाराष्ट्र

सरपंच सर्वांना सोबत घेऊन जाणारा असावा

बाजीराव घोडे

कोकरूड : गावच्या विकासाठी हेवेदावे, मतभेद विसरून पंचसूत्रीचा मेळ घालत एक दिलाने काम केल्यास कोणतंही गाव विकासापासून वंचित राहू शकत नाही. असे प्रतिपादन सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी केले. 

कोकरूड (ता. शिराळा) येथे शिवाजीराव देशमुख व्याख्यानमालेत आदर्श गाव घडविताना या विषयावर प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तामिळनाडू सरकारचे सचिव आनंद पाटील होते. यावेळी युवा नेते सत्यजित देशमुख, जी. प. सदस्य संपतराव देशमुख, फत्तेसिंगराव देशमुख प्रमुख उपस्थित होते. 

पेरे-पाटील म्हणाले की, सरपंच कोणत्याही पक्षाचा असून द्या, तो सर्वांना सोबत घेऊन जाणारा असावा. आजच्या काळात पद, पैसा, प्रतिष्ठा याला काडीचाही किंमत नाही तर तुम्ही तुमच्या सोबत किती जणाला घेऊन काम करता याला किंमत आहे. सर्वांना सोबत घेऊन काम कराल तरच गाव समृद्ध होणार आहे. दिवंगत शिवाजीराव देशमुख यांच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं नाव होतं. त्यांच्या स्वप्नातलं कोकरूड घडवायचं असेल तर ग्रामपंचायत कमिटीने पाटोदा सारख काम करणं आवश्‍यक आहे. 

आनंद पाटील म्हणाले, सरकारच्या अनेक योजना आहेत. त्या समजून घेऊन ग्रामपंचायत निधीचा वापर करताना प्राधान्य क्रम ठरऊन प्रामाणिकपणे विकासकामे करावीत. त्यामागे कोणताही हेतू ठेवू नये. ग्रामसेवक व सरपंच ही एक रथाची दोन चाके आहेत. त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन काम करावे. प्रास्ताविक नंदकुमार पाटील यांनी, तर पाहुन्यांची ओळख ग्रामिंण कथाकार बाबासो परिट व सूत्रसाचलन संजय घोडे-पाटील यांनी केले.आभार मोहन पाटील यांनी मानले. यावेळी माजी सभापती बाळासाहेब पाटील,हणमंतराव पाटील, बाजार समिती सभापती सुजित देशमुख,विकास नांगरे, सरपंच विलास वाघमारे, उपसरपंच पोपटराव पाटील, श्रीरंग नांगरे, गजानन पाटील, प्रा. ए.सी.पाटील, डॉ. एस एन पाटील, सुहास पाटील, सुनिल पाटील, रमेश पोतदार बाजीराव शेडगे,अंकुश नांगरे, तानाजी घोडे, आदीसह महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT