पश्चिम महाराष्ट्र

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीस "गोरज' मुहूर्त 

सकाळवृत्तसेवा

सातारा -  येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्‌घाटनाला अखेर मुहूर्त मिळाला. उद्या (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या इमारतीचे उद्‌घाटन होणार आहे. इमारतीचे काम पूर्ण होऊन सहा महिने झाले, तरी उद्‌घाटनाला मुहूर्त मिळेना म्हणून मावळते जिल्हाधिकारी आश्‍विन मुद्‌गल यांनी या इमारतीत कामकाज सुरू केले होते. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीचा हेरिटेजमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या इमारतीशेजारी दुसरी नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी मंजूर करून घेतला होता. त्यांच्याच काळात इमारतीचे बांधकाम सुरू झाले. साधारण पाच कोटी रुपयांची ही इमारत आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी लक्ष घालून हे काम पूर्ण करून घेतले. 2016 मध्ये या इमारतीचे काम पूर्ण झाले. 31 मार्चला इमारत महसूल विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली; पण उद्‌घाटनासाठी मुहूर्त सापडत नव्हता. कधी निवडणुकीची आचारसंहिता, कधी मुख्यमंत्र्यांच्या तारखा मिळण्यात उद्‌घाटन लांबले. त्यामुळे मावळते जिल्हाधिकारी आश्‍विन मुद्‌गल यांनी उद्‌घाटनाची वाट न पाहता नवीन कार्यालयात कामकाज सुरू केले होते. त्यांच्यासोबत अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनीही आपले कामकाज नव्या कार्यालयात सुरू केले. त्यामुळे नव्या इमारतीच्या उद्‌घाटनाला मुहूर्त कधी मिळणार, अशी चर्चा सुरू होती. जलसंधारणाच्या कामांच्या पाहणीच्या निमित्ताने मुख्यमंत्री गुरुवारी (ता. 18) मुक्कामी व शुक्रवारी (ता. 19) जलयुक्त पाहणी दौरा करण्यासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात उद्‌घाटनाचा मुहूर्त उद्या (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजताचा साधून घेतला जाणार आहे. त्यासाठी डझनभर मंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT