पश्चिम महाराष्ट्र

सातबारा संगणकीकरण ९६ टक्के पूर्ण

सकाळवृत्तसेवा

सातारा - सातबारा व फेरफारचे संगणकीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. आतापर्यंत १३ लाख ५७ हजार २३५ सातबारा उतारे संगणकीकरणाचे काम झाले असून, ९६ टक्के पूर्ण झाले आहे. आता प्रत्येक संगणकीकृत सातबारा मूळ हस्तलिखितांशी तंतोतंत जुळविण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील एक हजार ७१४ महसुली गावांपैकी एक हजार ७४ गावांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहेत.  

सातबारा संगणकीकृत करून तो घरबसल्या ऑनलाइन उपलब्ध करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासनाने हाती घेतला आहे. यानुसार डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत महसूल विभागाने डिजिटल सातबारा उतारे तयार करण्याचे काम सुरू केले होते. ते आता अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या मूळ हस्तलिखित सातबाराशी जुळविण्याचे काम सुरू आहे.

सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण झालेल्या ठिकाणी चावडी वाचन करून त्यामध्ये राहिलेल्या त्रुटी दूर करण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यात एकूण १४ लाख पाच हजार ३८ इतकी सातबाऱ्यांची संख्या आहे. त्यापैकी १३ लाख ५७ हजार २३५ सातबाऱ्यांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहेत. ४७ हजार ८०३ सातबाऱ्यांचे संगणकीकरण अद्यापही बाकी आहे. 

सातबाऱ्याची संख्या जास्त असलेले खंडाळा तालुक्‍यातील लोणंद, 
माणमधील म्हसवड, दहिवडी, माळवाडी, वरकुटे म्हसवड, खटाव तालुक्‍यांतील वडूज, म्हासुर्णे, कलेढोण, मायणी, निमसोड या गावांतील संगणकीकरणाचे काम सुरू आहे, तर इतर गावांतील संगणकीकृत सातबाऱ्यांचे रि-एडिटचे काम सुरू आहे. चावडी वाचनात खातेदारांकडून आलेल्या आक्षेपानुसार प्रत्येक संगणकीकृत सातबारा मूळ हस्तलिखितांशी तंतोतंत जुळविण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ४२६ गावांत हे काम पूर्ण झाले आहेत. 

आतापर्यंत एक हजार ७४ गावांतील सातबाऱ्याचे संगणकीकरण पूर्ण झाले आहे. सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर हे सातबारे ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे शेतकरी आपला सातबारा उतारा घरबसल्या मोबाईलवरही पाहू शकणार आहेत.

‘‘सातबारा संगणकीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच ऑनलाइन पद्धतीने सातबारे उपलब्ध होतील. त्यामुळे जमीनधारकांनी डिजिटल इंडिया उपक्रमास प्रधान्य द्यावे.’’ 
- श्‍वेता सिंघल, जिल्हाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT