पश्चिम महाराष्ट्र

केस पेपरवर सहीसाठी रुग्णांची भिरभिर

प्रवीण जाधव

सातारा - शासकीय रुग्णालयात मोफत उपचाराची सुविधा मिळण्यासाठी केस पेपरवर संबंधित अधिकाऱ्यांच्या सहीची आवश्‍यकता असते. त्यासाठी अधिकारी उपलब्ध नसल्याने रुग्णांची ससेहोलपट होत आहे. रुग्णालय प्रशासनाने तातडीने तोडगा काढण्याची मागणी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.

गरीब, वृद्ध, लहान मुले, रुग्णालयातील कर्मचारी अशा काही घटकांना शासकीय रुग्णालयात मोफत उपचार देण्याची सुविधा शासनाने केली आहे. त्यासाठी संबंधित रुग्णाच्या केस पेपरवर अधिकाऱ्यांच्या सहीची आवश्‍यकता असते. रुग्णाची तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी आवश्‍यकतेनुसार त्याला विविध तपासण्या करण्यास सांगतात. या तपासण्यांना शासकीय शुल्क असते. ते भरल्यानंतरच संबंधित रुग्णाला तपासणीसाठी घेण्यात येते. मोफत योजनेला रुग्ण पात्र असल्यास त्याच्या केस पेपरवर सही असावी लागते, तरच त्याची तपासणी होते.

जिल्हा रुग्णालयात ही सही करण्याचे अधिकार रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक, प्रशासकीय अधिकारी किंवा जबाबदारी दिलेल्या सामाजिक कार्यकर्त्याकडे आहे. शासकीय सुटी किंवा शनिवारी हे अधिकारी जिल्हा रुग्णालयात उपस्थित नसतात. त्यामुळे या काळात सुरू असणाऱ्या बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांना किंवा रुग्णालयातून सोडण्यात आलेल्या रुग्णांचे शुल्क माफ करायचे कोणी, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्यामुळे रुग्णांना हेलपाटा मारावा लागत आहे. त्याचा आजही अनेक रुग्णांना फटका बसला. त्यात वृद्ध, शासकीय कर्मचारी व लहान मुलांचा समावेश होता.

वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासणी सांगितली. मात्र, निःशुल्क सुविधेची सही नसल्यामुळे त्यांना तपासणीसाठी आत घेण्यात आले नाही. सुमारे दीड तास ते जिल्हा रुग्णालयातील विविध कार्यालयात फिरत होते. कार्यालयात उपस्थित असलेल्या व जिल्हा रुग्णालयाच्या योग्य संचलनाची जबाबदारी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उज्ज्वला माने यांचीही रुग्णांच्या  नातेवाइकांनी भेट घेतली. मात्र, ‘एकाच्या गैरहजेरीत दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक करण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे आहे. मी काही करू शकत नाही, तुम्ही परत या, नाही तर त्यांना बोलवा’ असे म्हणत हातवर केले. त्यामुळे करायचे काय, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. हताशपणे ते बाह्य रुग्ण विभागात बसले होते. रुग्णालयाच्या भोंगळ कारभारबद्दल ते तीव्र संताप व्यक्त करत होते. ही गोष्ट ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने निदर्शनास आणून दिल्यावर अखेरीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांनी स्वत: बाह्य रुग्ण विभागात येऊन सह्या केल्या. त्यामुळे रुग्णांना तपासण्या करता आल्या.

सामाजिक कार्यकर्त्याची केबीन बदलण्याची मागणी
सही करण्याची जबाबदारी असलेला सामाजिक कार्यकर्ता जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबीन समोरील खोलीत बसतो. एक तर केस पेपर, तपासणीसाठी रुग्णांना अर्धा- एक तास रांगेत उभे राहावे लागते. त्यानंतर तपासणीच्या ठिकाणी गेल्यावर ‘सही आणा,’ असे सांगितले जाते. त्यामुळे त्याची शोधाशोध सुरू होते. त्यात अनेक वृद्धांचाही समावेश असतो. त्यांना जिने चढून जाणे अवघड होते. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्याला केस पेपर काढला जातो, त्याच्या बाहेर बाह्य रुग्ण विभागात बसण्याची सोय करून त्या ठिकाणी माहिती देणारा फलक लावावा, अशी मागणी रुग्णांकडून होत आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT