सातारा - येथील बाजारपेठेत विक्रीस आलेल्या टेडिबेअर पाहताना तरुणी.
सातारा - येथील बाजारपेठेत विक्रीस आलेल्या टेडिबेअर पाहताना तरुणी. 
पश्चिम महाराष्ट्र

शुभेच्छापत्रे अन्‌ व्हॅलेंटाइन डे पार्टी..!

सकाळवृत्तसेवा

सातारा - प्रेम व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस म्हणून जगभरात १४ फेब्रुवारीला साजरा होणाऱ्या व्हॅलेंटाइन डेसाठी बाजारपेठ सज्ज आहे, तर प्रेमाच्या या उत्सवासाठी तरुणाई आतूर आहे. सामाजिकतेचे भान असलेली तरुणाई यंदाही हा उत्सव वंचित घटकांबरोबर साजरा करणार आहे. 

चॉकलेट्‌सची क्रेझ
यंदाच्या व्हॅलेंटाइनला शुभेच्छापत्रांबरोबरच विविध फ्लेवर्सच्या चॉकलेटचा स्वाद वाढणार आहे. विविध शॉपीज्‌मध्ये विविध फ्लेवर्समधील चॉकलेट उपलब्ध झाली आहेत. त्यात हॅंडमेड चॉकलेटसह इर्म्पोटेड चॉकलेटचा समावेश असून, चॉकलेटचे आकर्षक बॉक्‍स गिफ्ट देण्यावर अनेक जण भर देणार आहेत. 

गिफ्ट आर्टिकलमध्ये प्रेमाचा संदेश असणारे कॉफी कप, फोटोफ्रेम, तसेच टेडिबेअरला अधिक मागणी आहे. म्युझिकल टेडीही बाजारात उपलब्ध असून, त्या तरुणाईला भुरळ घालत आहेत. विशेषतः लाल-गुलाबी रंगाच्या गिफ्टस्‌ना यंदाही विशेष मागणी राहणार असल्याने त्यातील व्हरायटी उपलब्ध केली आहे. केवळ प्रियकर आणि प्रेयसीच नव्हे, तर आता नात्यातील प्रत्येकाप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हॅलेंटाइन साजरा करण्याची क्रेझ वाढली असून, शुभेच्छा पत्रांपासून ते विविध गिफ्ट आर्टिकलवर त्याचा नक्कीच प्रभाव आहे. 

व्हॅलेंटाइन डे पार्टीचे आयोजन करण्यासाठी कॉलेज कॅम्पस सज्ज झाला असून, यंदा बुधवारचा दिवस आल्याने कॅम्पसमध्ये या उत्सवाची धूम राहणार आहे. 

हॉटेल-रिसॉर्टही सज्ज
शहर आणि परिसरातील विविध हॉटेल्स आणि रिसॉर्टनी व्हॅलेंटाइन पार्टीचे आयोजन केले असून, सोशल मीडियावरही व्हॅलेंटाइन डेची ‘गुलाबी’ धूम सुरू झाली आहे. अनेकांनी या दिवशी ‘एंगेजमेंट’चा मुहूर्त साधण्यावर भर दिला आहे. दरम्यान, विवाह नोंदणी कार्यालयात संपर्क साधला असता, यावर्षी मात्र व्हॅलेंटाइन डेला विवाह करण्यासाठी कोणी नोंदणी केली नसल्याचे सांगितले.

कोणतं गिफ्ट देऊ?
व्हॅलेंटाइनला आपल्या प्रिय व्यक्तीसाठी नेमके काय करायचे, याचे प्लॅनिंग अगदी काही तासांपूर्वी करणाऱ्यांची संख्या साठ टक्‍क्‍यांहून अधिक आहे. मात्र, त्यांची तारांबळ उडू नये, यासाठी ऑनलाइन मार्केटमध्ये ‘व्हॅलेंटाइनला कोणतं गिफ्ट देऊ’ अशा मथळ्याखाली हटके पद्धतीने व्हॅलेंटाइनला काय करता येईल, याची माहिती उपलब्ध केली आहे. आकर्षक आणि मनमोहक दागिन्यांपासून ते लाल रंगांच्या विविध गारमेंटस्‌पर्यंतच्या असंख्य व्हरायटी येथे उपलब्ध असून, त्यावर विविध ऑफर जाहीर केल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT