पश्चिम महाराष्ट्र

अवैध दारू वाहतूक प्रकरणी शेडगेवाडीतील एकास अटक

सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड - महामार्गावरून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या एकास दिड लाखाच्या दारू साठ्यासह अटक केली. विकास सर्जेराव शेडगे ( रा. शे़डगेवाडी, ता. शिराळा) असे त्याचे नाव आहे. येथील कोल्हापूर नाका येथे शनिवारी रात्री येथील पोलिसांनी कारवाई केली. या गुन्ह्यात दारू वाहतूकीसाठी वापरलेली पाच लाखांची जीपही पोलिसांनी जप्त केली आहे.

शेडगेवाडी येथून एकजण जीपमधून (एम. एच. 10 सी ए. 9792) अवैध दारू वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरिक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाकाली सापळा रचण्यात आला. त्यात पोलिस निरिक्षक राजेंद्र राजमाने, गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरिक्षक हनुमंत गायकवाड, हवालदार सतीश जाधव, प्रदीप कदम, नितीन येलवे, प्रमोद पवार, सचिन गुरव हे सहभागी झाले होते.

संशयीताची जीप आल्यानंतर त्याची झडती घेतली. त्यात त्यांना अवैध दारूची वाहतूक सुरू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी एक लाख 53 हजार रुपयांची दारू  जप्त केली. कारवाईत जीपसह एकूण सहा लाख 53 हजार 084 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT