पश्चिम महाराष्ट्र

सावधान...फलटण शहरात फिरतोय बिबट्या!

सकाळवृत्तसेवा

फलटण शहर - शहरात बिबट्या दिसल्याचे अनेकांनी केलेले दावे खरे, की खोटे अशी चर्चा सुरू असतानाच फलटण शहरांतील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांनी बिबट्या कैद केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

मंगळवारी रात्री दीड वाजता सिटी प्राईड सिनेमाच्या आवारात वावरताना तेथील कॅमेऱ्यात बिबट्या "जेरबंद' झाला. त्यामुळे वनखाते, पोलिस, नगरपालिका यांनी त्याच्या शोध मोहिमेला सुरवात करण्याबरोबर नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

मंगळवारी (ता. 28) सकाळी साडेपाच वाजता नवलबाई मंगल कार्यालय, मारवाड पेठ येथे शहराच्या मध्यवर्ती भागात तेथील एक व्यापारी परगावी निघाले असताना त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर वन खात्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संपूर्ण शहरासह परिसर अक्षरश: पिंजून काढला. मात्र, त्यांना कोठेही बिबट्या आढळला नाही. तथापि विमानतळ परिसरात काहींनी बिबट्या पाहिल्याचे त्यांना सांगितले. बुधवारी (ता. 29) सकाळी बारस्कर चौकातील एका मंदिरात बिबट्याने दर्शन दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याची खातरजमा होऊ शकली नाही. दरम्यान, शहरातील गजानन चौक येथे असलेल्या सिटी प्राईड (जुने नामवैभव) थिएटरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रात्री दीड वाजता बिबट्या थिएटरच्या आवारात फिरताना व त्यानंतर थिएटरच्या कुंपण भिंतीवरून उडी मारून बाहेर जाताना चित्रीत झाल्याचे आढळून आल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून बिबट्या फलटण शहरात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व नगरसेवक रघुनाथराजे नाईक- निंबाळकर यांनी स्वत: सिटी प्राईड सिनेमा येथे जाऊन सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला बिबट्या पाहिल्यानंतर तेथील रखवालदार व अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांना बिबट्याची चाहूल लागली किंवा नाही याबाबत चर्चा केली. त्यानंतर त्या सुमारास बिबट्या घरावरून गेला असावा. त्यामुळे काही घरांचे पत्रे वाजल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. बिबट्या शहरात वावरत असल्याची खात्री झाल्यानंतर रघुनाथराजे नाईक- निंबाळकर यांनी वन खात्याचे अधिकारी, पोलिस अधिकारी व नगराध्यक्षा नीता मिलिंद नेवसे, मिलिंद नेवसे, पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून नागरिकांना जागृत करण्याची आवश्‍यकता निदर्शनास आणून दिली. नगरपालिका व वन खात्याच्या वाहनातून शहरात ध्वनिवर्धकाद्वारे याची माहिती देऊन विशेषत: सकाळी पहाटे फिरावयास जाणारे नागरिक, शालेय विद्यार्थी, पालकांसह सर्वच नागरिकांनी सावधानता बाळगावे, असे आवाहन केले.

परिसरातील गावांतही इशारा
शहराप्रमाणेच शहरालगतच्या कोळकी, जाधववाडी, ठाकुरकी, फरांदवाडी, अलगुडेवाडी वगैरे ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातही ध्वनिवर्धकाद्वारे ग्रामस्थांना माहिती देऊन सावधानता बाळगण्याबाबत आवाहन करण्याच्या सूचना संबंधित ग्रामपंचायतींना रघुनाथराजे नाईक- निंबाळकर यांनी केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT