सातारा - सॅनिटरी पॅडस्‌वरील जीएसटी रद्द करावा, या  मागणीचे निवेदन सेवाकर आयुक्त प्रांजली खडसे यांच्याकडे निवेदन देताना समिंद्रा जाधव, जयश्री पाटील, सीमा जाधव आदी.
सातारा - सॅनिटरी पॅडस्‌वरील जीएसटी रद्द करावा, या मागणीचे निवेदन सेवाकर आयुक्त प्रांजली खडसे यांच्याकडे निवेदन देताना समिंद्रा जाधव, जयश्री पाटील, सीमा जाधव आदी. 
पश्चिम महाराष्ट्र

सॅनिटरी पॅडस्‌वरील जीएसटी रद्द करा

सकाळवृत्तसेवा

सातारा - स्त्रियांच्या जिव्हाळ्याच्या वस्तूंवर जीएसटी शून्य टक्के आहे. मात्र, आरोग्य, स्वच्छता आणि सोयीसाठी महत्त्वाचा असलेल्या सॅनिटरी पॅडस्‌वर १२ टक्के जीएसटी लावला आहे. तो तातडीने रद्द करावा,
अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीने निवेदनाद्वारे सेवाकर आयुक्त प्रांजली खडसे यांच्याकडे आज केली.

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, कार्याध्यक्षा जयश्री पाटील, सेवा दल प्रदेश संघटिका सीमा जाधव यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज  खडसे यांची भेट घेतली व निवेदन दिले. निवेदनात महिला आघाडीने म्हटले की, जीवनावश्‍यक वस्तूंचा वापर व विक्री वाढावी आणि हानिकारक वस्तूंची विक्री कमी व्हावी, म्हणून जीएसटी एक प्रभावी साधन आहे.

स्त्रियांच्या जिव्हाळ्याच्या वस्तूंवर जीएसटी दर शून्य टक्के आहे. परंतु, स्त्रियांचे आरोग्य, स्वच्छता आणि सोय यासाठी अतिमहत्त्वाच्या असलेल्या सॅनिटरी पॅडस्‌वर जीएसटी परिषदेने १२ टक्के दर लावला आहे. स्त्रीचा सन्मान करण्याची आपल्या देशात संस्कृती आहे. पण, ती बोलण्यात असून उपयोगी नाही, याचा विचार होणे गरजेचे आहे. स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी पॅडस्‌ महत्त्वाची गोष्ट असून याचा वापर वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी सॅनिटरी पॅडस्‌वरील जीएसटी शून्य टक्के करावा व स्त्रीच्या आकांक्षाचा उचित सन्मान सरकारने करावा, अन्यथा नाईलाजाने राष्ट्रवादी महिला आघाडीला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल, असे म्हटले आहे. यावेळी उपमुख्य संघटिका सविता शिंदे, हेमलता पवार, कुसूमताई भोसले, वैशाली सुतार, सुनीता शिंदे, सुजाता घोरपडे, सुनीता संकपाळ, सुवर्णा पवार, नंदिनी जगताप, रशिदा शेख, नलिनी जाधव, कल्पना जवळ, श्‍वेताली मोहिते, पूजा काळे, उषा पाटील आदींसह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Australia Squad T20 WC 24 : ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा! ODI वर्ल्डकप जिंकवणाऱ्या पॅट कमिन्सऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची माळ

'..तर तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही'; मनोज जरांगे-पाटलांचा थेट कर्नाटक सरकारला इशारा

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT