Fish Died In The Lake 
पश्चिम महाराष्ट्र

मासे खाण्याची चंगळ, तोच...

सकाळ वृत्तसेवा

गोंदवले (जि.सातारा) : माण नदीतील गावालगतच्या बंधाऱ्यात मोठे मासे आल्याने खवय्यांची चंगळ होणार, तोच हे मासे मरून पाण्यावर तरंगू लागले. कालपासून हजारो मासे मरून पडल्याने ऐन आपत्ती काळात गोंदवलेकर लोकांचे आरोग्य या घटनेने धोक्‍यात आले. आज सकाळी ही बाब लक्षात येताच तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्याने तात्पुरता का होईना गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला. बंधाऱ्यातून दिवसभरात सुमारे टनभर मृत मासे काढून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. 

सततच्या दुष्काळावर उपाय योजना म्हणून माण नदीवर साखळी बंधारे बांधण्यात आले आहेत. असाच एक बंधारा गोंदवल्यातील नागरी वसाहतीला लागूनच बांधण्यात आला आहे. गेल्या वर्षी झालेल्या पावसासह उरमोडी प्रकल्पातील पाण्याने हा बंधारा भरून वाहिला. सध्याही या बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा आहे. परिणामी बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात मासे पैदास झाली. सध्या बंधाऱ्यात मोठ्या आकाराचे मासे आहेत. त्यामुळे खवय्यांसाठी हा बंधारा पर्वणी ठरला आहे. परंतु गेल्या दोन दिवसांपासून या बंधाऱ्यातील मासे अचानक मरून पडू लागल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सध्या कोरोनाचे संकट असतानाच गोंदवल्यात मृत माशांमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. आज सकाळी बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात मृत मासे तरंगत असल्याची बाब ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना सुरू केली. युवकांच्या मदतीने सुमारे टनभर मृत मासे बंधाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. हे मासे मोठ्या खड्ड्यांमध्ये गाढून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी अमोल पवार, आरोग्य विभागाचे महादेव गंबरे यांनी पाहणी केली. 

या बंधाऱ्यातील मासे अचानक मरून पडण्यामागे श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरातील सांडपाण्याचे कारण असल्याची चर्चा सुरू होती. मात्र समाधी मंदिर समितीने हा आरोप फेटाळून लावला. दरम्यान या बंधाऱ्यालगत ग्रामपंचायतीच्या लघू पाणी पुरवठ्याचे बोअर असून या पाण्यामुळे परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्‍यात आले असल्याचे सचिन पाटोळे यांनी सांगितले. या बंधाऱ्यात मिसळणाऱ्या सांडपाण्याची वेगळी व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. 

परिसरातील काही बंधाऱ्यात पाणी असल्याने मासे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु या बंधाऱ्यातील मासे अचानक मरून पडल्याने लोकांनी मासे खाण्याचे टाळावे असे आवाहन सरपंच अश्‍विनी कट्टे यांनी केले आहे. 
सातारा : एकीकडे दिलासा तर दूसरीकडे धाकधूक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT