Electric Current sakal
पश्चिम महाराष्ट्र

Belgaum : 'हेस्कॉम'चा गलथान कारभार; विद्युतवाहिनीच्या स्पर्शामुळं शाळकरी मुलीचा हाकनाक बळी

खेळता खेळता मधुराचा हात उच्च दाबाच्या तारेला लागला आणि पाहताक्षणीच ती उडून दुसऱ्या मजल्यावर पडली.

सकाळ डिजिटल टीम

मुलगी मित्रमैत्रिणींसमवेत खेळताना हा प्रकार घडला. नेहरुनगर येथील कृष्णा बोंगाळे यांच्या घरासमोरून हेस्कॉमची उच्च दाबाची (हाय व्होल्टेज केबल) तार गेली आहे.

बेळगाव : मच्छे येथील नेहरूनगर परिसरात श्रीनिवास फॅक्टरीशेजारी वास्तव्यास असणाऱ्या १३ वर्षीय मुलीचा हेस्कॉमच्या (Hescom Electricity) गलथान कारभारामुळे हाकनाक बळी गेला. मधुरा केशव मोरे असे मुलीचे (School Girl) नाव आहे.

सोमवारी (ता. २२) ही घटना घडली असून, मुलगी मित्रमैत्रिणींसमवेत खेळताना हा प्रकार घडला. नेहरुनगर येथील कृष्णा बोंगाळे यांच्या घरासमोरून हेस्कॉमची उच्च दाबाची (हाय व्होल्टेज केबल) तार गेली आहे.

यापूर्वीही बोंगाळे कुटुंबीयातील सदस्याला अशाच पद्धतीने विजेचा झटका लागला होता. ही तार खासगी जागेतून गेली असून, ती हटविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि हेस्कॉम अधिकाऱ्यांकडे अनेकवेळा तक्रार केली आहे, मात्र हेस्कॉम अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अद्याप ही तार हटविली नाही. मूळ येळ्ळूर, राजहंसगड येथे राहणारी आणि सध्या वडिलांच्या कामानिमित्त कोल्हापूर येथे स्थायिक असणारी मधुरा ही आपल्या आजोळी सुटीचा आनंद घेण्यासाठी आली होती.

खेळता खेळता मधुराचा हात उच्च दाबाच्या तारेला लागला आणि पाहताक्षणीच ती उडून दुसऱ्या मजल्यावर पडली. दोन वर्षांपासून सातत्याने हेस्कॉमकडे याबाबत तक्रार करूनही अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षमुळे आज मुलीला जीव गमावावा लागला. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत बेळगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू होत्या.

सहा दिवसांत दोन घटना

भाजी विक्रेत्या महिलेचा विजेच्या धक्यात मृत्यू झाल्याची घटना १७ मे रोजी घडली होती. ७६ वर्षीय वृध्दा भाजीविक्री करून घरी परतण्याच्या तयारीत असताना विद्युत तारेच्या स्पर्शाने त्या अत्यवस्थ झाल्या. वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेत मृत्यू झाला. यानंतर आज मच्छेत हेस्कॉमच्या गलथानपणामुळे मुलीचा बळी गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

Akola News : नवरात्रीत अकोला पोलिसांकडून नागरिकांना दिलासा! २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल परत; ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश

Latest Marathi News Live Update : पुण्यात पाण्याचं संकट! गुरुवारपासून १० टक्के कपात, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

Chenab Bridge : आयफेल टॉवरप्रमाणे चिनाब पुलाचेही घेता येणार विहंगम दर्शन!

Navratri Diet Tips for Fast: नवरात्रीत उपवासाचे पदार्थ खाताय? पचन चांगलं ठेवण्यासाठी आहारात वाढवा 'हे' पोषणतत्त्व

SCROLL FOR NEXT