is.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

इस्लामपुरात काय घडतयं  पहा... "त्या' मंत्र्यांची चौकशीची मागणी 

सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर, (सांगली) : इस्लामपूर शहराची बदनामी होण्यासाठी एक मंत्री कारणीभूत ठरल्याची टीका माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे त्याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी सर्व पक्षीय मागणी करत असल्याचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी संगितले. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात असताना मंत्री जयंत पाटील यांनी काय केले ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

नगराध्यक्ष पाटील यांच्या सह युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विजय पवार, नगरसेवक वैभव पवार, वंचित आघाडीचे नेते शाकिर तांबोळी, भाजपचे तालुका अध्यक्ष प्रसाद पाटील, शहराध्यक्ष अशोक खोत, मनसेचे सनी खराडे, स्वाभीमानीचे मकरंद करळे, ओबीसी संघटनेचे नंदकुमार कुंभार, आरपीआयचे आप्पासाहेब कांबळे उपस्थित होते. 

नगराध्यक्ष पाटील म्हणाले, इस्लामपूर शहराची राज्यात बदनामी झाली आहे. कोरोनापूर म्हणण्या इतपत मजल गेली. याची शहरातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना खंत आहे. शहरातील व्यापारी, शेतकरी, सामन्याचेल प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. शहरातील लोकांना अन्यत्र प्रवेश नाकरला गेला. शहरावर प्रथमच असा प्रसंग आला हे वेदनादायी आहे.

शहराची ही अवस्था होण्याला नेमके कोण कारणीभूत आहे याचा पोलिसांनी शोध घ्यावा. प्रकाश आंबेडकर यांनी जबाबदारीने कलेले विधान पोलीस व प्रशासनाने गांभीर्याने घावे. आम्ही सर्व पक्षीय नेते राज्यपाल, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, जिल्हाधिकारी, व उच्चस्तरीय लोकांकडे पाठपुरावा करणार आहोत. आपल्या मंत्री पदाचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी." 
ते म्हणाले, "राज्यात प्रत्येक मतदार संघात त्या त्या भागातील लोकप्रतिनिधी लोकांच्या मदतीला धावून जात आहेत. मात्र इस्लामपूरचे आमदार कुठे आहेत? कोरोना रुग्ण सापडल्यानंतर आठ-दहा दिवसांत दाखल झाल्यानंतर त्यांनी शहरासाठी स्वतःच्या फंडातून एक रुपया तर दिला का? माध्यमांच्या मुलाखती मध्ये इस्लामपूर शहरासाठी जे केले ते मीच केले हे पुराण त्यांनी बंद करावे.

31 मार्चला ते येण्यापूर्वी शहरातील संकट आटोक्‍यात आले होते. खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांनी आपापल्या परीने मदत केली, मात्र लोकप्रतिनिधी असलेल्यांनी एक रुपयाही दिला नाही. प्रशासकीय कामात सर्वात जास्त हस्तक्षेप यांनी केला. आमदार म्हणून त्यांनी पुरात तालुक्‍यात मोठी मदत केली, मग इस्लामपुरात का नाही? या संकटात त्यांनी राजकारण आणले.

पालकमंत्री म्हणून घेतलेल्या बैठकीला नगराध्यक्षांना बोलावले नाही. नागरिक त्यांचे प्रश्न सोडवायला समर्थ आहेत, त्यांनी आहे तिथेच थांबावे.शहर कोरोनामुक्त होण्यात प्रशासन, पदाधिकारी, जनतेचा मोठा वाटा आहे. जनतेने स्वतःला क्वारंटाईन करून घेतले. आम्ही आमचे कर्तव्य केले आहे, त्याचे श्रेय घेणार नाही. 

यादी कोणी केली व्हायरल 
तांबोळी म्हणाले, "कोरोनाच्या संकटात प्रयत्न सर्वांनीच केले आहेत, हे कुणा एकट्याचे काम नाही. राज्य पातळीवर याचा शो करणे दुर्दैवी आहे. इस्लामपुरच्या रुग्णांची नावे, समाज यांची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली याला जबाबदार कोण? त्यांच्यावर कारवाई व्हावी." विजय पवार म्हणाले, "महापुराच्या काळात निवडणूक तोंडावर असल्यामुळे जे दोन युवराज फिरत होते, ते सध्या कुठे आहेत?" 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: ''सर्वात जास्त पुरावे तर माझ्याकडे, विरोधी पक्षातले कोण-कोण नेते...'' मुख्यमंत्र्यांचं खरात प्रकरणावर सर्वात मोठं विधान

IPL 2026: 'एक मिनिटही वाया घालवू नका, गेल्यावर्षी जिंकलो त्यामुळे...' विराट कोहलीचा RCB च्या खेळाडूंना सल्ला

Latest Marathi News Live Update : भारत सरकार काळजी घेतंय, पाकिस्तान, बांगलादेशची अवस्था बघा : मुख्यमंत्री फडणवीस

Latur News: बारा बंधाऱ्यांची होणार दुरुस्ती; शासनाकडून ३३ कोटी ७७ लाखांचा निधी; लवकरच कामांना सुरवात

इंडिगोच्या प्रवाशांचं हाल! लंडन ते मुंबई ९ तासांच्या प्रवासाला लागले ३ दिवस, अचानक इजिप्तमध्ये उतरवलं; नुकसानभरपाईची मागणी

SCROLL FOR NEXT