Nipani  sakal media
पश्चिम महाराष्ट्र

Nipani : सुरेश पाटील यांची 'कृतिग्या हॅकथॉन`साठी निवड

शोधप्रबंध सादर; चारा व्यवस्थापन, समस्या व उपायांचा समावेश

अमोल नागराळे

निपाणी : राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (एनएएचईपी) व भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित कृषी अभियांत्रिकी विभाग तंत्रज्ञानातील `कृतिग्या हॅकथाॅन-2021` उपक्रमासाठी बुदिहाळ (ता. निपाणी) येथील कृषी पंडीत सुरेश पाटील यांची निवड झाली आहे. राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, भारतीय कृषी संशोधन परिषद, कृषी अभियांत्रिकी विभाग यांच्यावतीने शेतीमधील नवीन तंत्रज्ञान आणि नवनवीन संकल्पना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी, त्याच्या प्रसारासाठी वारंवार प्रयत्न होत असतात. कृतिग्या हॅकथाॅन अंतर्गत प्राध्यापक सदस्य, उद्योजक आणि कृषि संशोधकांना यांत्रिकीकरणासाठी चालना देण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञान आणि उपाय योजना विकासित करण्यासाठी संधी दिली जात असते.

कृषि क्षेत्राच्या कामकाजात महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन कृषी उत्पादकता वाढवणे, बिगरशेती क्षेत्रात विकास करणे, महिलांसाठी सुलभ उपकरणांचा विकास आणि यांत्रिकीकरण या बाबींना चालना देण्याचे कार्य परिषद करीत असते. कृषी यांत्रिकी क्षेत्रात शिक्षण क्षमता, नवसंकल्पना आणि समस्या सोडवणे, रोजगार निर्मिती आणि उद्योजकता वाढविणे यासंबंधी शोध निबंध प्रस्ताव मागविले जातात. त्यासाठी बुदिहाळ येथील सुरेश पाटील यांना पशुसंवर्धन विभागात येणाऱ्या चारा व्यवस्थापन संबंधित समस्या व तंत्रज्ञान उपाय यावर शोधनिबंध सादर करण्याची संधी मिळाली आहे.

सुरेश पाटील यांनी परिषदेकडे शोध प्रबंध सादर केला आहे. मागील वीस वर्षापासून पाटील पशुसंवर्धन क्षेत्रात प्रयोग करीत आहेत. पाटील यांच्या प्रयोगशील कार्याची दखल घेऊन कर्नाटक राज्य सरकारने त्यांना कृषि पंडित पुरस्कार जाहीर केला आहे. पाटील यांनी आत्तापर्यंत विविध राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेतला आहे. प्रवीण पाटील, एम. जी. आवटे, कृषी अधिकारी पुरुषोत्तम पिराजे, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ आदर्शगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील वेगवेगळे उपक्रम करीत आहेत. कृतिग्या हॅकथाॅनसाठी निवड झाल्याने त्यांचे कौतूक होत आहे.

"आपल्या शेतीविषयक कार्याची दखल घेऊन `कृतिग्या हॅकथाॅन`साठी निवड झाल्याचे समाधान वाटते. या संधीचा उपयोग करून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱयांना लाभ होण्यासाठी आपला प्रयत्न राहील."

-सुरेश पाटील, कृषी पंडीत, बुदिहाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT