Send Waris Pathan to Pakistan
Send Waris Pathan to Pakistan 
पश्चिम महाराष्ट्र

VIDEO : भैया क्यो बोले...वारीस पठाण को पाकिस्तान भेजो

सकाळ वृत्तसेवा

नगर ः विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी आमदार अनिलभैया राठोड अलिप्त होते. पक्षाचे सरकार आल्यानंतरही ते फटकूनच होते. ज्या लोकांनी निवडणुकीत दगा दिला, त्यांच्याबद्दल शिवसेनेत चर्चाही झडली होती. परंतु पुढे काहीच झाले नाही. मात्र, भैया आता सक्रिय झाले आहेत. एमआयएम आमदाराच्या निषेधार्थ ते थेट रस्त्यावर उतरलेले नगरकरांनी पाहिले.

एमआयएम पक्षाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्वत्र जोरदारपणे निषेध होत अाहे. आज नगर येथे शिवसेनेने वारीस पठाण यांच्या  प्रतिकात्मक पुतळा दहन केले. वारीस पठाण मुर्दाबाद, पाकिस्तान को भेज दो, अशा घोषणा यावेळी शिवसैनिकांनी दिल्या.


वारिस पठाण याने दोन दिवसापूर्वी हिंदू मुस्लिमांच्या संदर्भामध्ये  वादग्रस्त वक्तव्य करून हिंदूंच्या भावना दुखावल्या होत्या व त्यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होऊ लागलेला आहे.

नगर येथील नेता सुभाष चौकामध्ये शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी पठाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून त्याला जोडे मारले व केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला .
यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक योगीराज गाडे, दत्तात्रय कावरे ,संतोष गेनप्पा, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, शशिकांत देशमुख, रमेश खेडकर, मदन आढाव, पप्पू भिंगारदिवे, गणेश झिंजे , शिवसैनिक व पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी वारीस पठाण हा गद्दार असून त्याने हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, अशा व्यक्तीला या देशांमध्ये राहण्याचा काही अधिकार नाही ,त्याला पाकिस्तानमध्ये  पाठवून द्या, असे ते म्हणाले. या देशात राहून जर गद्दारांची भाषा करणारा असेल तर यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

त्यांनी पाकिस्तानातच त्यांना हाकलून द्या असे सांगून पाकिस्तानमध्ये हिंदू असा बोलू शकतो का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे अशा गद्दारांना आता त्याची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT