पश्चिम महाराष्ट्र

आटपाडी तालुक्यातील सात तलाव ओव्हर फ्लो

सकाळ वृत्तसेवा

आटपाडी - टेंभूचे पूर्ण क्षमतेचे पाणी आणि त्याला वरूणराजाची मिळालेली जोड यामुळे आटपाडी तालुक्यातील सात तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. तर पाच तलाव भरण्याच्या मार्गावर आहेत. याशिवाय अनेक ओढ्यांनाही पाणी सोडले आहे. टेंभूच्या पाण्यामुळे बऱ्याच कालखंडानंतर आटपाडी तालुका 'पाणीदार' झाला आहे.

यावर्षी वरुणराजाने आटपाडी तालुक्यावर मेहरबानी दाखवली आहे. आतापर्यंत चारशे मिलिमीटर पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी सरासरी साठ मिलिमीटर पाऊस पडला होता. यावर्षी सरासरीच्या 110 टक्के पाऊस पडला आहे. 19 ऑक्‍टोबरला टेंभूचे पंप सुरू केले. कालव्यावरील कामे सुरू असल्यामुळे सारे पाणी आटपाडी तलावात सोडले. 300 दशलक्ष घनफूट क्षमतेचा आटपाडी तलाव अवघ्या पाच दिवसात भरला. त्यानंतर वीस दिवस शुक ओढ्यातून पाणी पुढे सोडण्यात आले. कचरेवस्ती, अर्जुनवाडी, घाणंद, चिंचाळे, मिटकी आणि कामत हे सात तलाव पूर्ण भरले आहेत. सध्या निंबवडे, माळेवस्ती, दिघंची, बनपुरी, शेटफळे तलावात पाणी सोडले असून ते भरण्याच्या मार्गावर आहेत. बनपुरीतून मेळमेळी तलावातही पाणी सोडले आहे.

या आठवड्यात हे तलाव भरले जातील. तसेच आटपाडीचा शुक ओढा, माणगंगा नदी,  करगणी- शेटफळेचा बेलवण ओढयातूनही पाणी सोडले आहे. अनेक बंधारेही भरले आहेत. पाण्याची मागणी प्रलंबित राहिलेली नाही. कधी नव्हे आटपाडी तालुका एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणीदार झाला आहे. यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढणार आहे. बुध्दीहाळ तलावात शेटफळे ओढयातून पाणी सोडले असून किमान पंधरा दिवस तरी पाणी पुरवठा चालू राहणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT