sharad pawar sharad pawar
पश्चिम महाराष्ट्र

‘वैद्यकीय महाविद्यालय काढणे म्हणजे छोटेस शहरच वसवण्यासारखे’

सकाळ डिजिटल टीम

उसर (अलिबाग) : एखादे महाविद्यालय काढणे हे खूप अवघड असते. त्यासाठी शासनाला मोठी गुंतवणूक करावी लागते. त्यात वैद्यकीय महाविद्यालय काढणे म्हणजे छोटेस शहरच वसवण्यासारखे असते, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील उसर गावी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीचे (Medical College) भूमिपूजन मंगळवारी (ता. २२) पार पडले. या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहून अत्यंत समाधान वाटले. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या दृष्टिकोनातून अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केला.

इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. इमारतीचा भूमिपूजन सोहळा होत आहे. मात्र, त्याआधी ६० ते ७० विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू देखील करण्यात आले, हे महत्त्वाचे असल्याचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नागपूर विमानतळावरील सुरक्षा मशिन्स पूर्ववत सुरू

SCROLL FOR NEXT