पश्चिम महाराष्ट्र

खादाड्या कोंबडीची सांगलीत चर्चा; हिने मोडला विक्रमच!

सदाशिव पुकाळे

सांगली : शेटफळे ता. आटपाडी येथील या पोल्टी फार्मवर वजनापेक्षा जास्त अन्न खाणारी कोंबडी आहे. या खादाड्या कोंबडीची सध्या चर्चा परीसरीत होत आहे.ज्येष्ठ पत्रकार अशोक पवार यांच्या पोल्ट्री फार्मवर ही कोंबडी आहे. अन्न खावं असं म्हटलं जातं मात्र या ठिकाणी असणारी ही कोंबडी जणूकाही खाण्यासाठीच जगत आहे अशी वस्तुस्थिती आहे. पवार यांच्या पोल्ट्री फार्मवर बॉयलर जातीच्या कोंबड्या आहेत. या कोंबड्या पैकी एक कोंबडी दिवसभर खाद्य खात असते. आज या कोंबडीचे वय 76 दिवसाचे आहे. ही कोंबडी दररोज किमान अर्धा किलोहून जास्त खाद्य खाते. म्हणजे जवळपास 10 कोंबड्यांचे खाद्य ही कोंबडी एकटीच खात आहे.(shetphal-hen-poultry-farm-in-sangli-news)

कोंबडीला चालताना तिने खाल्लेल्या खाद्याच्या वजनामुळे नीट चालता सुद्धा येत नाही. तरीसुद्धा ही कोंबडी दिवसभर खाद्य खाण्यातच व्यस्त असते. आता आपल्या क्षमतेपेक्षा जास्त अन्न खाणे ही कोंबडी विश्वविक्रम तर करणार नाही ना असं वाटायला लागले आहे. अशोक पवार हे शेटफळे गावचे रहिवाशी असून वीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करतात शेती करायची म्हटलं तर पाणी नाही. त्यामुळे जगण्याचं साधन म्हणून पंधरा वर्षांपासून पोल्ट्री व्यवसाय करतात.

पोल्ट्री व्यवसाय करत असताना अनेक वेगवेगळे अनुभव आले. त्यामध्ये काही वेळेला तीन पायाची कोंबडी त्यांच्याकडे होती. कोरोनाची महामारी असल्याने पिल्ले घ्यावी की नको या विचारात होते. परंतु त्यांनी धाडसाने कोंबड्यांची पिल्ले विकत आणून पोल्ट्री सुरू केली. बघता-बघता ही पिल्ले लहानाची मोठी होऊ लागली. त्यामध्ये अशी एक कोंबडी निघाली की तिच्या वजनापेक्षा जास्त खाद्य खात आहे. अनेक जण हे पाहून आश्चर्यचकित झाले. सध्या कोंबडीला चालता सुद्धा येत नाही. तरीसुद्धा दिवसाला अर्ध्या किलोपेक्षा जास्त खाद्य खात आहे.याबाबत अशोक पवार यांना विचारले असता म्हणाले माझ्या पंधरा वर्षांच्या कारकिर्दीमध्ये यापूर्वी तीन पायाची कोंबडी एक होती आणि यावर्षी वजनापेक्षा जास्त खाणारी कोंबडी पोल्ट्री फार्म वरती आहे. पोल्ट्री फार्म चा व्यवसाय करत असताना पंधरा वर्षांमध्ये असे अनेक वेगवेगळे अनुभव आले आहेत.

सर्वसाधारणपणे सध्या कोंबडीचे वजन दीड किलो च्या दरम्यान आहे दिवसांमध्ये दोन ते तीन वेळा त्या कोंबडीला अर्धा किलोचे खाद्य घालावे लागत आहे. म्हणजेच वजनापेक्षा जास्त खाद्य खात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : 'मोदींच्या शब्दांवर आता कुणाचाच विश्वास नाही'; के. सी. वेणुगोपाल यांचा घणाघात

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

Ambabai Temple Restoration : ब्रेकर आणि ग्राईंडरचा वापर! अंबाबाई मंदिराच्या संवर्धनात मोठी हेरफेर; पुरातत्त्व विभागाविरोधात हिंदुत्‍ववादी संघटनांसह सर्वपक्षीय आक्रमक

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT