पश्चिम महाराष्ट्र

शिराळ्यात नाईक, महाडिक यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच

शिवाजीराव चौगुले

शिराळा - शिराळा विधानसभा मतदारसंघातून सम्राट महाडिक यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपकडे उमेदवारीची मागणी केल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे शिराळा मतदारसंघात प्रथमच भाजपमध्ये शिवाजीराव नाईक व सम्राट महाडिक यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच होणार आहे. भाजपमध्ये अनेकांचे स्वागत केले जात आहे. महाडिक यांना भाजप आपल्या तंबूत घेणार का? त्यांच्या पाठीशी अदृश्‍य शक्ती कोणाची आहे? भाजप नेते कोणता पवित्रा घेणार? याबद्दल उत्सुकता आहे. महाडिक यांनी उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर करून चेंडू भाजपच्या कोर्टात सरकवला आहे.

शिराळा मतदारसंघात आमदार शिवाजीराव नाईक, राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांचे तीन सक्रिय गट आहेत. येथील राजकारण या तीन गटांभोवती फिरत राहते. हे सर्वज्ञात आहे. वाळव्यातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व नानासाहेब महाडिक कुटुंबीय यांची साथ कोणाकोणाला मिळत असे. आत्ता सम्राट महाडिक यांनी ‘वेळोवेळी आम्ही भाजपला मदत केली. त्याचा फायदा त्यांना झाला. यावेळी विधानसभेची उमेदवारी मलाच द्यावी’ अशी  मागणी रेटली आहे. आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सांगून अदृश्‍य शक्ती पूर्ण ताकदीने झटणार आहे, असेही जाहीर केले आहे.

यापूर्वी शिराळा मतदारसंघातून प्रत्येक पक्षाचा एकच उमेदवार असे. काँग्रेसमधून सत्यजित देशमुख, राष्ट्रवादीतून मानसिंगराव नाईक, भाजपमधून आमदार शिवाजीराव नाईक हे उमेदवार असतील असे सध्याचे  चित्र आहे. नव्हे तर अशीच लढत होईल, असा अंदाज आहे. त्यात सम्राट महाडिक यांनी भाजपकडे उमेदवारी मागितल्याने नाईक व महाडिक गटांत चढाओढ राहणार आहे.

नाईक यांच्या रूपाने भाजपला २०१४ मध्ये भाजपला सक्षम उमेदवार मिळाला. त्यामुळे भाजपचे मतदार संघात चांगले अस्तित्व निर्माण झाले. त्यांना मंत्रिपद मिळाले नसले तरी त्यांनी चांगला निधी आणला. आपणाला भाजपची उमेदवारी पुन्हा मिळावी असा त्यांनी प्रयत्न  सुरू केला आहे. त्यांची भूमिका काय राहणार याकडे मतदारसंघाच्या नजरा आहेत. आजपर्यंत साथ देणारे आता हक्क मागू लागल्याने चांगलीच रंगत भरणार हे  निश्‍चित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT