पश्चिम महाराष्ट्र

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांच्या अंत्यदर्शनासाठी नागरिकांची गर्दी

शिवाजीराव चौगुले

शिराळा - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे माजी सभापती आमदार शिवाजीराव बापूसो देशमुख यांचे पार्थिव आज सकाळी साडे अकरा वाजता शिराळा येथील काँग्रेस कमिटी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.

सकाळी आठ वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी काँग्रेस कमिटी येथे गर्दी केली होती. देशमुख यांचे सोमवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. त्यांचे पार्थिव मुंबईहुन रुग्णवाहिकेतून शिराळा येथे साडे अकरा वाजता आणण्यात आले. यावेळी पत्नी सरोजनी, चिरंजीव सत्यजित, नात साईतेजस्विनी,  मुलगी डॉ शिल्पा, भाऊ फत्तेसिंगराव, सुन रेणुका, जावई डॉ मनोज आदी परिवारातील मंडळी उपस्थित होती. 

पै .नामदेवराव मोहिते, नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के , उपनगराध्यक्ष किर्तीकुमार पाटील,  विजयराव नलवडे, अमरसिंह नाईक, केदार नलवडे, अभिजित नाईक, रणजितसिंह नाईक, उदयसिंगराव नाईक, देवेंद्र पाटील, प्रताप पाटील, गौतम पोटे, महादेव कदम, प्रतापराव यादव, बंडा डांगे, नेहा सूर्यवंशी, सीमा कदम, अर्चना कदम,  पी.जी.शिंदे, अजय जाधव, आनंदराव पाटील, बी.जी.पाटील,  यांच्यासह शिराळा व वाळवा तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

एक तास पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवून साडे बारा वाजता पार्थिव कोकरूड येथे नेण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT