Shivsena former MLA Ratikant Patil appreciates his son Amar Patil
Shivsena former MLA Ratikant Patil appreciates his son Amar Patil  
पश्चिम महाराष्ट्र

वडीलांसह नेत्यांनीही केली अमर पाटलांची शिफारस 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जुळे सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालयात गुरुवारी आयोजित केलेल्या शेतकरी आणि कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेचे माजी आमदार रतिकांत पाटील यांनी मुलगा जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांना दक्षिण विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी नेत्यांकडे केली. अमर पाटील यांनीही आजवर केलेल्या विकास कामांच्या जोरावर आमदार होण्याची इच्छा जाहीरपणे नेत्यांसमोर बोलून दाखविली. 

यावेळी मंचावर शिवसेनेचे समन्वयक प्रा. शिवाजी सावंत, सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, माजी आमदार दिलीप माने, जिल्हाप्रमुख महेश कोठे, शिवसेना शहरप्रमुख हरिभाऊ चौगुले, महिला आघाडीच्या नेत्या शैला स्वामी, उज्वला येलुरे, नगरसेवक अमोल शिंदे, विराज पाटील, प्रताप चव्हाण आदी उपस्थित होते. मी आजही वडीलांसमोर जास्त बोलत नाही असे सांगत अमर पाटील यांनी नेत्यांसमोर जाहीरपणे आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली. 

उमेदवार कोणीही असला तरी सर्वांनी एकजुटीने कामाला लागावे असा सल्ला महिला आघाडीच्या नेत्या शैला स्वामी यांनी दिला. जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनी शिवसेनेसोबत जलसंधारणमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी केलेल्या कामांची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून सोडविला जाईल. दक्षिण सोलापूरची जागा शिवसेनेला मिळणार. अमर पाटील यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवण्याचे काम त्यांनी चालूच ठेवले पाहिजे. आपल्या भागात पक्षाची ताकद वाढवा अशी सूचनाही त्यांनी केली. 

उमेदवारीचा सर्वाधिकार पक्षप्रमुख आणि संपर्कप्रमुख जलसंधारण मंत्री प्रा. तानाजी सावंत यांना आहे. त्यांच्याकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल. अमर पाटील यांचे काम चांगले आहेत. विविध शेतकऱ्यांच्या समस्यांसह विविध प्रश्‍न त्यांनी हाताळले आहेत असे सांगून सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांनी नेत्यांकडे अमर पाटील यांची शिफारस केली. 

शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. मुलगा अमर पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी इच्छा करतानाच माजी आमदार रतिकांत पाटील यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघात उमेदवारी कोणालाही मिळाली तरी भगवा फडकावण्यासाठी आपण सारे प्रयत्न करूया असे आवाहन केले. 

या मेळाव्याला ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बरडे, जिल्हा प्रमुख गणेश वानकर, युवा नेते उदय पाटील यांची अनुपस्थिती होती. दिलीप माने हे तुळजापूला जाणार असल्याची चर्चा असल्याचे माजी आमदार रतिकांत पाटील यांनी जाहीरपणे सांगितले. त्यावर मी तुळजापुरला जाणार नाही असा खुलासा माने यांनी केला. 

दक्षिण विधानसभा ही शिवसेनेची जागा आहे. या भागात शिवसेनेचे वर्चस्व आहे राहील. माजी आमदार दिलीप माने शिवसेनेसोबत झाल्यामुळे आपली ताकद वाढली आहे. शिवसेनेत फक्त आदेश चालतो. दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचाच आमदार होईल. युती आणि उमेदवारीचा निर्णय पक्षप्रमुखच घेतील. 
- प्रा. शिवाजी सावंत, समन्वयक, शिवसेना 

मी पक्षाचे काम करण्यासाठी शिवसेनेत आलो आहे. निवडणूक जवळ आली आहे आता एकमेकांविरोधात बोलून वातावरण दूषित करायचे नाही. पक्षप्रमुखांचा आदेश सर्वांनी पाळावा. आपापसातील मतभेद दूर करणे आवश्‍यक आहे. जो उमेदवार दिला जाईल त्यांच्यासाठी आपण काम करू. 
- दिलीप माने, माजी आमदार 

दिलीप माने यांनी कोणत्याही अपेक्षेशिवाय शिवसेनेत प्रवेश केला आहे. मी 1996 पासून शिवसेनेत कार्यरत आहे. तेव्हापासून मी निष्ठेने शिवसेना वाढविली आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी विकासकामे केली आहेत. आजवर केलेल्या विकासकामांच्या आधारावर अमर पाटील यांना विधानसभेला संधी मिळावी. 
- रतिकांत पाटील, माजी आमदार 

जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी बरीच कामे केली आहेत. वडील माजी आमदार रतिकांत पाटील यांच्या माध्यमातूनही दक्षिण विधानसभा मतदार संघात अनेक विकासकामे झाली आहेत. मी दक्षिण विधानसभेसाठी इच्छुक आहे. सर्वांची साथ आणि आशीर्वाद हवा आहे. 
- अमर पाटील, जिल्हा परिषद सदस्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Freedom At Midnight: 'फ्रिडम एट मिडनाइट' चा फर्स्ट लूक आऊट; जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेत 'हा'अभिनेता

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SCROLL FOR NEXT