shivtare
shivtare 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापुर जिल्ह्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार

अक्षय गुंड

माढा (सोलापूर) - जिल्ह्यातील माढा,मंगळवेढा, सांगोला या तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेना उपनेते आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी केलेल्या मागणीनुसार मंत्रालयात दहा ते बारा दिवसात बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.

जयवंतराव सावंत प्रतिष्टानच्या वतीने सोनारी (ता.पंरडा) येथे भैरवनाथ कारखान्यावर आयोजित करण्यात आलेल्या विवाह सोहळ्या प्रसंगी आले असता. ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, आमदार डाॅ तानाजीराव सावंत, प्राध्यापक शिवाजीराव सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, सोलापुर जिल्हाप्रमुख गणेश वानकर, जिल्हा परिषद सदस्या शैलाताई गोडसे आदि उपस्थित होते.    

यावेळी माढा तालुक्यातील कुर्डू येथील काही उपोषणकर्त्यांनी आमदार डॉ. सावंत यांच्या माध्यामातुन भेट घेऊन पाण्याबाबतची समस्या मांडली होती. त्याअंनुषगाने पत्रकारांशी बोलताना नामदार शिवतारे म्हणाले की, स्वंयसेवी संस्था, साखर कारखाने व राज्यशासन या तिघांच्या माध्यामातुन सुक्ष्म सिंचन योजना राबवली जात आहे. त्यामुळे शेतीसाठी वापरल्या जाणार्या पाण्याची ३० टक्के इतकी बचत होत आहे. हे बचत झालेले पाणी. मागणी असलेल्या इतर गावांना देता येवु शकते. त्याच धर्तीवर कुर्डू या गावासाठी सिना-माढा उपसा सिंचन योजनेचे बचत होणारे पाणी देता येवु शकेल का? याचा अहवाल एक महिन्याच्या आत अधीक्षक अंभियता यांनी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात सविस्तर चर्चेसाठी मंत्रालयात उपोषणकर्त्यांसह बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी तलावात टेंभू योजनेचे पाणी सोडण्यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे यांनी निवदेण दिले आहे.टेंभू योजनेचे टप्पा क्रंमाक ५ इतपर्यंत काम पुर्ण झाले आहे. त्याठिकाणावरून जत कालवा क्रंमाक १ याची खोदाई पुर्ण झाल्यास ते पाणी शिरनादंगी तलावात येवु शकते. ते काम पुर्ण करून येत्या फेब्रुवारी-मार्च आवर्तनात पाणी सोडण्यासाठी त्या ठिकाणच्या शेतकर्यांसह बैठकीचे आयोजन केले जाईल. सांगोला तालुक्यातील माणगाव येथील टेंभू च्या पाण्यासंदर्भात मागणीचे निवदेण आहे. तोही प्रश्न याबैठीकीच्या माध्यामातुन मार्गी लावला जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; एस. एम. मुश्रीफ यांची मागणी

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

SCROLL FOR NEXT